टेक कंपनी नथिंग पुढील आठवड्यात आपला नवीन सब-ब्रँड स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत आहे. सीएमएफ फोन १ स्मार्टफोनसह कंपनी सीएमएफ बड्स प्रो २ आणि सीएमएफ वॉच प्रो २ देखील लॉन्च करणार आहे. ही लॉन्चिंग येत्या ८ जुलै रोजी एका इव्हेंटच्या माध्यमातून केली जाईल. कंपनीच्या पहिल्या डिव्हाइसचे कॅमेरा डिझाइन आणि नवीन स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. टीझर इमेजमध्ये डिव्हाइसचा कॅमेरा मॉड्यूल देखील शेअर करण्यात आला आहे.
कंपनीने मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवरील आपल्या अधिकृत अकाऊंटवर म्हटले आहे की, सीएमएफ फोन १ मध्ये बॅक पॅनेलवर ड्युअल कॅमेरा मॉड्यूल मिळेल. टीझर पोस्टमध्ये दिसत आहे की, फोनच्या रियर मॉड्यूलच्या वरच्या डावीकडे व्हर्टिकल पिल आकाराचा कॅमेरा मॉड्यूल दिला जाईल. यात दोन वेगवेगळ्या वर्तुळाकार युनिटमध्ये कॅमेरा सेन्सर मिळणार आहेत. या डिव्हाइसमध्ये युजर्सना नवीन डेडिकेटेड कॅमेरा फीचर्सही मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा फोन ब्लॅक, ब्लू, लाइट ग्रीन आणि ऑरेंज कलरमध्ये उपलब्ध असेल.
सीएमएफ फोन १ चा कॅमेरा मॉड्यूल थोडा उंचावलेला आहे आणि त्याचा रंग इतर बॅक पॅनेलच्या तुलनेत वेगळा आहे, हे टीझर फोटोवरून समजू शकते. याशिवाय फोनच्या बॅक पॅनेलवरील प्लेट काढून टाकली जाऊ शकते, असे दिसते. सध्या हे स्पष्ट झालेले नाही की हे फक्त डिझाइन आहे की याच्या मदतीने युजर्स बॅटरी आणि इतर इंटरनल अॅक्सेस करू शकतील.
मागील सोशल मीडिया पोस्टमध्ये कंपनीने पुष्टी केली आहे की सीएमएफ फोन १ मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी मिळेल. यासह तुम्हाला दोन दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ मिळेल. यात मीडियाटेक डायमेंसिटी ७३०० ५जी प्रोसेसर आणि ८ जीबी रॅम देण्यात आली आहे. फोनमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट, एचडीआर १०+ सपोर्ट आणि २००० न्यूटनचा पीक ब्राइटनेस सह ६.६७ इंचाचा एमोलेड डिस्प्ले मिळेल. १६ एमपी सेल्फी कॅमेऱ्याव्यतिरिक्त फोनमध्ये ५० एमपी प्रायमरी कॅमेरा सेटअप मिळेल आणि तो आयपी ५२ रेटिंग देईल, असे समोर आले आहे. या फोनची किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी असेल आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. कंपनी लाँच ऑफरसह हा फोन १५ हजार ९९९ रुपयांपर्यंत लाँच करू शकते.
संबंधित बातम्या