अवघ्या ३ दिवसांत ४७ टक्क्यांनी वाढला भाव, तुमच्याकडं आहे का इन्शुरन्स कंपनीचा हा शेअर?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  अवघ्या ३ दिवसांत ४७ टक्क्यांनी वाढला भाव, तुमच्याकडं आहे का इन्शुरन्स कंपनीचा हा शेअर?

अवघ्या ३ दिवसांत ४७ टक्क्यांनी वाढला भाव, तुमच्याकडं आहे का इन्शुरन्स कंपनीचा हा शेअर?

HT Marathi Desk HT Marathi
Dec 05, 2024 12:39 PM IST

Niva Bupa Helath Insurance Share price : निवा बुपा हेल्थ इन्शुरन्सच्या शेअर्समध्ये सलग तिसऱ्या दिवशी ११ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळं कंपनीचं मार्केट कॅप १८ हजार कोटींच्या पुढं गेलं आहे.

कंपनीचा आयपीओ एकूण १.९० पट सब्सक्राइब झाला.
कंपनीचा आयपीओ एकूण १.९० पट सब्सक्राइब झाला.

Stock Market News Today : अलीकडंच शेअर बाजारात सूचीबद्ध झालेल्या निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. सलग तिसऱ्या दिवशी कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गुरुवारी बीएसईवर निवा बुपा हेल्थ इन्शुरन्सचा शेअर ११ टक्क्यांनी वधारून १०९.४१ रुपयांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचला. 

गेल्या तीन दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये ४७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. निवा बुपा हेल्थ इन्शुरन्सचे मार्केट कॅप १८,००० कोटी रुपयांच्या पुढं गेलं आहे. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ६९.२० रुपये आहे.

जीएसटी कपातीच्या शक्यतेचा परिणाम

आरोग्य आणि आयुर्विमा पॉलिसींवरील वस्तू व सेवा करात (GST) कपात केली जाऊ शकते, अशा बातम्यांमुळं निवा बुपा हेल्थ इन्शुरन्सच्या शेअरमध्ये तेजी आली आहे. जीएसटी कौन्सिलनं आरोग्य आणि आयुर्विमा पॉलिसींच्या व्याजदरात कपात करण्याची शिफारस केल्यास पॉलिसीधारकांच्या विम्याची किंमत कमी होऊ शकते, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी सांगितलं. सध्या आयुर्विमा आणि आरोग्य विमा पॉलिसीसाठी भरलेल्या प्रीमियमवर १८ टक्के जीएसटी आकारला जातो.

निवा बुपा हेल्थ इन्शुरन्सचा आयपीओ ७ नोव्हेंबर २०२४ रोजी उघडला गेला आणि १२ नोव्हेंबरपर्यंत खुला राहिला. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत ७४ रुपये होती. कंपनीचा शेअर १४ नोव्हेंबर २०२४ रोजी ७८.५० रुपयांवर बाजारात लिस्ट झाला होता. निवा बुपा हेल्थ इन्शुरन्सचा आयपीओ एकूण १.९० पट सब्सक्राइब झाला. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा २.८८ पट सब्सक्राइब झाला होता. तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार (एनआयआय) श्रेणीचा हिस्सा ०.७१ पट होता. कंपनीच्या आयपीओमध्ये क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (क्यूआयबी) श्रेणीत २.१७ पट हिस्सा दिसून आला.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner