Multibagger stocks : गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात भारतातील रस्त्यावर लवकरच इथेनाॅलवर चालणाऱ्या गाड्या धावतील असे सुतोवाच केले होते. या बातमीने इथेनाॅलचे उत्पादन करणाऱ्या प्राज इंडस्ट्रीजचे शेअर्सनी वेग घेतला. ही एक बायो फ्युएल टेक्नाॅलाॅजी सेवा देणारी प्रमुख कंपनी आहे. जागतिक पटलावरही या कंपनीने आपले बस्तान बसवले आहे.
प्राज इंडस्ट्री भारतातील २ जी इथेनाॅल टेक्नाॅलाॅजी अँड एक्सपिरियन्सचा ७० टक्के मार्केट हिस्सा काबीज करते. याशिवाय जगातील १० टक्के इथेनाॅल उत्पादन (चीन वगळता) हीच कंपनी करते. या स्माॅल कॅप कंपनी मार्केट कॅप ६९४८ कोटी रुपये आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी भारताने प्रतिबद्धता दाखवली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत या कंपनीचा स्टाॅक्स गुंतवणूकदारांच्या लिस्टवर अग्रक्रमाने राहिल. सरकारनेही इथेनाॅलच्या विक्रीवर भर दिला आहे.
शुक्रवारी ०.१५ टक्के घसरणीसह कंपनीचा शेअर्स ३७७.५० रुपयांच्या पातळीवर येऊन स्थिरावला. यावर्षभरात प्राज इंडस्ट्रीजच्या स्टाॅक्समध्ये ५ टक्के वाढ झाली आहे. गेल्या तीन वर्षात कंपनीच्या गुंतवणूकदारांना ४८२ टक्क्यांपेक्षा अधिक लाभ झाला आहे.