निसस फायनान्स सर्व्हिसेसची शेअर बाजारात दणक्यात एन्ट्री, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  निसस फायनान्स सर्व्हिसेसची शेअर बाजारात दणक्यात एन्ट्री, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी

निसस फायनान्स सर्व्हिसेसची शेअर बाजारात दणक्यात एन्ट्री, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी

Dec 11, 2024 10:38 AM IST

Nisus Finance Services IPO Listing : निसस फायनान्स सर्व्हिसेसचा आयपीओ आज बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर लिस्ट झाला. हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी लकी ठरला आहे.

प्रीमियर एक्सप्लोसिव्ह शेअर परफॉर्मन्स आणि स्टॉक स्प्लिट
प्रीमियर एक्सप्लोसिव्ह शेअर परफॉर्मन्स आणि स्टॉक स्प्लिट

IPO Listing News Today : निसस फायनान्स सर्व्हिसेसनं आज शेअर बाजारात दणक्यात पदार्पण केलं. कंपनीचा शेअर आज तब्बल २५ टक्क्यांच्या प्रीमियमसह सूचीबद्ध झाला. आयपीओ किंमत १८० असलेला हा शेअर २२५ रुपयांवर लिस्ट झाला. त्यामुळं गुंतवणूकदारांना मोठा नफा झाला. लिस्टिंगनंतर या शेअरला ५ टक्क्यांचं अप्पर सर्किट लागलं आणि शेअर २३६.२५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला.

मुंबई स्थित निसस फायनान्स सर्व्हिसेसचा आयपीओ ४ ते ६ डिसेंबर दरम्यान लिलावासाठी खुला होता. हा आयपीओ १९२ पट सबस्क्राइब करण्यात आला. ११४.२४ कोटी आकाराच्या या एसएमई आयपीओसाठी १७० ते १८० रुपये प्रति शेअर असा दरपट्टा निश्चित करण्यात आला होता. १०१.६२ कोटी रुपयांची नवीन शेअर विक्री आणि ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत १२.६१ कोटी रुपयांच्या ७,००,८०० शेअर्सची विक्री असं या आयपीओचं स्वरूप आहे.

काय करते ही कंपनी?

निसस फायनान्स सर्व्हिसेस कॉर्पोरेट ग्राहकांना व्यवहार सल्ला आणि निधी व्यवस्थापनासह वित्तीय सेवा पुरवते. कंपनी दोन व्यवसाय विभागांद्वारे कार्य करते आणि सेबी-नोंदणीकृत एआयएफ अंतर्गत चार योजनांचे व्यवस्थापन करते. निसस फायनान्सचं उत्पन्न प्रामुख्यानं फंड मॅनेजमेंट फी, व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) मधून सुमारे १,००० कोटी रुपये येतं. आयएफएससी-गिफ्ट सिटी (गांधीनगर), डीआयएफसी-दुबई (यूएई) आणि एफएससी, मॉरिशस येथे फंड मॅनेजमेंट इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी कंपनीने नवीन इश्यूमधून निव्वळ उत्पन्नाचा वापर करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner