Nissan Magnite Geza : जबरदस्त सेफ्टी फिचर्ससहित निस्सान मॅग्नाईट गेझा दाखल, बुकिंग सुरु
Nissan Magnite Geza : निस्सान मोटर्स इंडियाने भारतीय ग्राहकांसाठी त्यांच्या सर्वाधिक विकल्या जाणार्या B-SUV चे मॅग्नाईट गेझा स्पेशल एडिशन सादर केले आहे.
Nissan Magnite Geza : निसान मॅग्नाइट गेझा स्पेशल एडिशनची प्रतीक्षा आता संपत आहे. कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी त्यांच्या सर्वाधिक विकल्या जाणार्या बी-एसयूव्हीच्या मॅग्नाईट गेजाचे स्पेशल एडिशन सादर केले आहे. यासोबतच स्पेशल एडिशनचे बुकिंगही सुरू झाले आहे. ग्राहक ही कार कंपनीच्या अधिकृत डिलर शोरूममधून फक्त ११,००० रुपये भरून बुक करू शकतात.
ट्रेंडिंग न्यूज
स्पेशल फिचर्स
मॅग्नाइट गेझा स्पेशल एडिशनच्या खास वैशिष्ट्यांनी ग्राहकांना आकर्षित केले आहे. या संकल्पनेवर आधारित मॅग्नाइट गेझा स्पेशल एडिशनमध्ये प्रगत इन्फोटेनमेंट वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. यात उच्च रिझोल्यूशन २२.८६ सेमी टचस्क्रीन, वायरलेस कनेक्टिव्हिटीसह अँड्रॉइड कारप्ले, प्रीमियम जेबीएल स्पीकर, ट्रॅजेक्टोरी रिअर कॅमेरा, अॅप-आधारित नियंत्रणासह सभोवतालची प्रकाशयोजना इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे.
किंमत २६ मे ला होणार जाहीर
ग्राहकांसाठी Nissan Magnite Geza स्पेशल एडिशनचे बुकिंग सुरू झाले आहे. निसान मोटर इंडियाच्या कोणत्याही शोरूममध्ये ११ हजार रुपये देऊन कार बुक केली जाऊ शकते. तर, कारची किंमत २६ मे २०२३ रोजी घोषित केली जाईल.
सेफ्टी फिचर्स
Nissan Magnite ला ग्लोबल NCAP द्वारे अॅडल्ट ऑक्युपंट सुरक्षेसाठी 4-स्टार सेफ्टी रेटिंग प्राप्त झाली आहे. निसानने मॅग्नाइटला त्याच्या सर्व प्रकारांमध्ये अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्यांसह परिष्कृत केले आहे. कारमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (TCS), हिल स्टार्ट असिस्ट (HSA), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) यांसारख्या सुरक्षा वैशिष्ट्यांचा वापर करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
विभाग