Auto Sale zero : निस्सान इंडियासाठी भारतीय बाजारपेठून फारसा चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. कंपनीच्या मॅग्नाईट एसयुव्हीला ग्राहकांचा बरा प्रतिसाद मिळाला. पण निस्सान किक्सला तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे कंपनीने या गाड्यांचे बुकिंग्ज बंद कऱण्याचा निर्णय घेतला आहे. निस्सानने किक्सचे बुकिंग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरही केवळ मॅग्नाईटचे बुकिंग सुरु ठेवले आहे. दरम्यान किक्सचे बुकिंग थांबवण्यासंदर्भात कंपनीकडून अधिकृतरित्या सांगण्यात आलेले नाही.
गेल्या तीन महिन्यांपासून शून्य विक्री
निस्सान किक्सचे बुकिंग बंद केले आहे. ही बाब गेल्या सहा महिन्यांच्या डेटावरुन समजू शकते. सप्टेंबर २०२२ पासून किक्सच्या मागणीत भारतीय बाजारात घट होत गेली. सप्टेंबर २०२२ मध्ये या गाडीची विक्री अंदाजे १०८ यूनिट्स होती. आँक्टोबरमध्ये वाढून ती २४२ यूनिट्स झाली. पण नोव्हेंबरमध्ये केवळ ३ यूनिट्सची विक्री झाली. डिसेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत एकही किक्सची विक्री झालेली नाही. गेल्या तीन महिन्यांपासून विक्री शून्ट झाली आहे. तर दुसरीकडे मॅग्नाईच्या विक्रीत गेल्या सहा महिन्यात अंदाजे १५, २९२ यूनिट्सची विक्री झाली आहे.
किक्सवर ५९ हजारांची सवलत
निस्सान किक्सच्या खरेदीवर ५९ हजारांची बचत होणार आहे. या गाडीवर ३० हजारांचा एक्सेंच बोनस, १९ हजारांचा कॅश डिस्काऊंट, १० हजार रुपयांपर्यंत काॅर्पोरेट सवलत दिली जात आहे. जर कंपनी कार उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेत असेल तर त्यावर डीलर्सकडून अधिकाधिक सवलत दिली जाईल. दरम्यान २०२२ मध्ये निस्सान किक्स दाखल झाली होती.
संबंधित बातम्या