youtuber nishcha shah story: एका तरुणीने इन्व्हेस्टमेंट बँकरची मोठ्या पगाराची नोकरी सोडून स्वत:चे यूट्यूब चॅनल सुरू केले. हे चॅनल नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले असून आज ही तरुणी वर्षाला कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहे. निश्चा शाह असे या तरुणीचे नाव आहे. निश्चा ही एका वर्षापूर्वी लंडनमध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून काम करत होती. कॉर्पोरेट जगतात सुमारे दहा वर्षे घालवल्यानंतर तिने तीची मोठ्या पगाराची नोकरी सोडून YouTube चॅनल सुरू करण्याचा निर्णय घेतला. तिचा हा निर्णय योग्य ठरला. आज ती पूर्णवेळ YouTuber असून ती दरमहा तिच्या मासिक पगारापेक्षा चार पटीने अधिक कमाई करत आहे.
२०२२ मध्ये निश्वा लंडनमध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून काम करत होती. तिच्या मेहनतीमुळे ती वर्षाला सुमारे २.५६ लाख डॉलर्स पगार मिळत होती. १० वर्ष हे काम केल्यावर निश्वाच्या मनात काहीतरी नवीन करण्याचा विचार आला. सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत निश्चाने सांगितले की, मला इतरांना गुंतवणुक कशी करायची या बाबत मार्गदर्शन करायचे होते. पण मला जे काम करायचे होते ते मोठ्या उद्योगपतींना मदत करत करायचे होते.
२०२३ मध्ये, मी माझी नोकरी सोडली आणि पूर्णवेळ YouTuber झाले. माझे संपूर्ण लक्ष वैयक्तिक वित्त विषयक माहिती देणारे चॅनल बनवण्यावर होते. माझा हा निर्णय योग्य ठरला . मे २०२३ ते मे २०२४ दरम्यान मी YouTube वरून सुमारे ८ कोटी रुपये कमावले. निश्चाने सांगितले की, आज मी पूर्वीपेक्षा जास्त पैसे कमावत आहे आणि त्याच वेळी मी लोकांना मदत देखील करत आहे. मला जे चांगले वाटते तेच मी कते लोकांना मदत करण्यापेक्षा चांगली कोणतीही गोष्ट नाही.
निश्वा शाहने सांगते की जेव्हा तिने नोकरी सोडली तेव्हा तिने आधीच ९ महिन्यांच्या पैशांची तरतूद करून ठेवली होती. कारण YouTube चे जग अनिश्चिततेने भरलेले आहे. हा निधी मिळाल्याने माझा आत्मविश्वास वाढला आणि मी माझ्या सर्व शक्तीनिशी आर्थिक सल्ला देणारे व्हिडिओ तयार करू लागली.
शहा यांनी सांगितले की, मी हे पाऊल अचानक उचलले नाही. यासाठी पूर्ण तयारी केली होती. कारण मला माहीत होतं की मला लांब पल्ला गाठायचा आहे. यामुळे पूर्ण तयारी करून मी चॅनल सुरू केले. आणि ते पूर्ण ताकदीने वाढवले.
शाह यांना युट्युबवर रातोरात यश मिळाले नाही. १ हजार ससक्रायबपर्यंत पोहोचण्यासाठी तिला ११ महिने वाट पहावी लागली. पण तिचे नशीब बदलले जेव्हा सप्टेंबर २०२२ मध्ये तिच्या आयुष्यावरील एक व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यामुळे तिला ५० हजार सबस्क्राइबर्स मिळाले. यातून तिने ३ लाख रुपये कमवले.
निश्चा सध्या मुख्यतः "पैशाच्या सवयी ज्यामुळे तुम्ही गरीब होऊ शकता'' या सारख्या विषयावर माहिती देणारे व आर्थिक विषयक सल्ला देणारे व्हिडिओ तयार करते. "तुमचे पहिले हजार रुपये कसे गुंतवायचे" यावर देखील ती मार्गदर्शन करते. सध्या तिच्या व्हिडिओंना YouTube वर ९ ते १० लाख व्ह्यूज मिळतात. तिचा हा प्रवास थक्क करणारा आहे.
संबंधित बातम्या