एनएचपीसीच्या शेअरची किंमत: सार्वजनिक क्षेत्रातील एनएचपीसीने आंध्र प्रदेशात पंप्ड स्टोरेज हायड्रोपॉवर प्रकल्प आणि इतर अक्षय प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी आंध्र प्रदेश पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन (एपीजेनको) बरोबर संयुक्त उद्यम करार केला आहे. कंपनीने सांगितले की, पहिल्या टप्प्यात यगंती (१००० मेगावॉट) आणि राजूपालेम (८०० मेगावॅट) हे दोन पंप्ड स्टोरेज प्रकल्प (पीएसपी) संयुक्तपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात अन्य प्रकल्पांची निवड करण्यात येणार आहे.
एनएचपीसीचे अध्यक्ष आणि एमडी आरके चौधरी आणि एपीजेनकोचे व्यवस्थापकीय संचालक केव्हीएन चक्रधर बाबू यांनी करारावर स्वाक्षरी केली. यावेळी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू उपस्थित होते. आंध्र प्रदेशात ऊर्जा साठवणूक सोल्यूशन्स विकसित करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. २०३० पर्यंत ५०० गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा आणि २०७० पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टाच्या अनुषंगाने हे आहे.
आता सोमवारी एनएचपीसी लिमिटेडच्या शेअरवर नजर राहणार आहे. सध्या याची किंमत ९५.२७ रुपये आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत शुक्रवारी हा शेअर २ टक्क्यांनी वधारून बंद झाला. गेल्या वर्षभरापासून हा शेअर गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देत आहे. जुलै 2024 मध्ये शेअरची किंमत 118.45 रुपयांपर्यंत होती. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये शेअरची किंमत 48.48 रुपये होती.