स्मार्टफोन निर्माता सॅमसंग कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी ए१५ 5G स्मार्टफोनचे नवे स्टोरेज व्हेरिएंट लॉन्च केले आहे, ज्याची किंमत १७ हजार ९९९ रुपये इतकी आहे. या व्हेरियंटमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. यापूर्वी या स्मार्टफोनमध्ये ८ जीबी रॅम/ २५६ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम/ १२८ जीबी व्हेरिएंट पर्याय उपलब्ध आहे. ज्यामुळे मिड रेंज स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
काउंटरपॉइंट रिसर्चच्या अहवालानुसार, गॅलेक्सी ए१५ 5G सीरिज ही गॅलेक्सी ए १४ ची अपडेट व्हर्जन आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए१४ सीरिज २०२३ मध्ये भारतातील सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या 5 जी स्मार्टफोनचा किताब जिंकला होता. भारतीय ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करून किफायतशीर दरात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान पुरविण्याची सॅमसंगची वचनबद्धता ही नवी भर अधोरेखित करते.
सॅमसंग गॅलेक्सी ए१५ 5G मध्ये ६.५ इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले सुसज्ज गॅलेक्सी ए१५ 5G मध्ये ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि डोळ्यांच्या आरामासाठी कमी ब्लू लाईट यासह इमर्सिव्ह व्ह्यूइंग अनुभव प्रदान केला आहे. स्पष्ट आणि स्थिर व्हिडिओ कॅप्चरसाठी व्हीडीआयएससह ५० मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळत आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १३ मेगापिक्सचा फ्रंट कॅमेरा आहे.
गॅलेक्सी ए१५ 5G मध्ये नॉक्स सिक्युरिटी प्लॅटफॉर्म आहे, जो ऑटो ब्लॉकर, प्रायव्हसी डॅशबोर्ड आणि सॅमसंग पासकी सारख्या फीचर्ससह वापरकर्त्याच्या डेटा सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन दिले जाते. गॅलेक्सी ए१५ 5G मध्ये क्रिस्टल-क्लिअर कॉलसाठी व्हॉइस फोकस आणि डिव्हाइसमध्ये अखंड फाइल शेअरिंगसाठी क्विक शेअरसह अनेक आकर्षक फीचर्स मिळत आहेत. याव्यतिरिक्त, आयडी आणि पेमेंट माहितीच्या सोयीस्कर स्टोरेजसाठी डिव्हाइस सॅमसंग वॉलेटला सपोर्ट करते.