SIM Cards New Rules : सिमकार्डशी संबंधित नियमांमध्ये बदल; आता मोबाइल नंबर पोर्ट करणं झालं अवघड!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  SIM Cards New Rules : सिमकार्डशी संबंधित नियमांमध्ये बदल; आता मोबाइल नंबर पोर्ट करणं झालं अवघड!

SIM Cards New Rules : सिमकार्डशी संबंधित नियमांमध्ये बदल; आता मोबाइल नंबर पोर्ट करणं झालं अवघड!

Jul 01, 2024 06:39 PM IST

SIM Card Number Portability Rules : सिमकार्डशी संबंधित नियमांमध्ये बदल करण्यात आले असून हे आजपासून (०१ जुलै) लागू झाले आहेत. नव्या नियमांतर्गंत नंबर पोर्ट करण्यासाठी ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त लागणार आहे.

सिमकार्ड संबंधित नियमांमध्ये १ जुलैपासून बदल
सिमकार्ड संबंधित नियमांमध्ये १ जुलैपासून बदल

SIM Card Replacement: आज जुलै महिन्याचा पहिला दिवस असून आजपासून सिमकार्ड खरेदी आणि मोबाइल नंबर पोर्ट करण्यासंदर्भातील नवे नियम लागू झाले आहेत. गेल्या आठवड्यात सरकारने टेलिकॉम अ‍ॅक्ट २०२३ लागू केला असून नव्या नियमांकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते. या नवीन नियमांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात, ज्यामुळे सिमकार्ड वापरकर्त्यांना पुढे कोणतीही अडचण येणार नाही.

सर्वात आधी हे जाणून घेणे महत्वाचे आहे की, एका व्यक्तीच्या नावावर फक्त ९ सिमकार्ड सक्रिय राहू शकतात. एखाद्या व्यक्तीच्या नावावर ९ पेक्षा जास्त सिमकार्ट असल्यास त्याला तरुंगवास किंवा मोठा दंड भरावा लागणार आहे. याशिवाय, मोबाइल नंबर पोर्टिंगसंबंधित नियमातही बदल झाला आहे.

मोबाइल नंबर पोर्ट प्रक्रिया

ग्राहकांना आतापर्यंत पहिल्या क्रमांकावरून दुसऱ्या टेलिकॉम कंपनीत पोर्ट करता येत होते, ही प्रक्रिया सोपी होती. आता जर कुणाला आपला नंबर पोर्ट करायचा असेल, तर त्यासाठी आधी अर्ज करावा लागेल. यासाठी अर्ज केल्यानंतर तुम्हाला काही काळ थांबावे लागेल आणि ओळखीव्यतिरिक्त इतर तपशीलांची पडताळणी करावी लागेल.

ओळखपत्राबरोबरच पत्ता पुरावाही देणे अनिवार्य

मोबाइल नंबर पोर्ट करण्यासाठी युजर्सला पूर्वीप्रमाणेच वन टाइम पासवर्ड (ओटीपी) देण्यात येणार आहे. नंबर पोर्ट करताना त्याची गरज भासणार आहे. नवीन सिम घेण्यासाठी आवश्यक ओळखपत्राबरोबरच आता पत्त्याचा पुरावाही सादर करावा लागणार आहे. मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी दरम्यान बायोमेट्रिक पडताळणी देखील आवश्यक असू शकते.

पोर्टेबिलिटीशी संबंधित नियमांमध्ये नवव्यांदा सुधारणा

मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीशी संबंधित नियमांमध्ये अनेक बदल केले जाऊ शकतात. मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी रेग्युलेशन २००९ मध्ये यापूर्वी आठ बदल करण्यात आले होते आणि आता त्यात नवव्यांदा सुधारणा करण्यात आली आहे. सिमकार्डशी संबंधित फसवणुकीला आळा घालणे हा या सुधारणांचा उद्देश आहे. नव्या नियमांचे उल्लंघन केल्यास तीन वर्षांचा तरुंगवास किंवा दोन लाखांचा दंड भरावा लागू शकतो.

 

Whats_app_banner