नवी दिल्ली : नोकरदारांसाठी सरकार चांगली बातमी घेऊन येणार आहे. लवकरच नवा कामगार कायदा संसदेत सादर केला जाणार आहे. हा कायदा मंजूर झाल्यास कामगारांना चांगला फायदा होणार आहे. या नव्या कामगार कायद्यांतर्गत कर्मचारी एका वर्षात ३० दिवसांपेक्षा जास्त पगाराची रजा घेऊ शकणार नाहीत. जर या सुट्ट्या ३० दिवसांपेक्षा जास्त शिल्लक असतील तर कंपनीला कर्मचार्यांना पूर्ण रक्कम द्यावी लागणार आहे. म्हणजेच या सुट्ट्या आता कर्मचाऱ्यांना एनकॅश करता येणार आहेत.
या संदरभात इकॉनॉमिक टाईम्समध्ये वृत्त प्रकाशित झाले आहे. त्यानुयासर नव्या कामगार कायद्यानुसार व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामकाजाच्या परिस्थिती संहिता (ओएसएच कोड), २०२० नुसार एखाद्या कर्मचाऱ्याला एका कॅलेंडर वर्षात किमान ३० दिवसांची सशुल्क रजा दिली जाऊ नये. जर कर्मचार्याने ३० दिवसांपेक्षा जास्त काळ रजा दिली असेल, तर कंपनीला ३० दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागतील या सारखे नियम या नव्या कामगार कायद्याने लागू होण्याची शक्यता आहे.
OSH कोड नुसार रजा रोखीकरणाची रक्कम वेतन संहितेच्या अंतर्गत परिभाषित केली आहे. त्यानुसार वेतनाच्या संदर्भात ती मोजली जाणार आहे. नियमनुसार कामगारांच्या वेतनात रोजगाराच्या अटींनुसार कामाच्या संदर्भात देय असलेल्या सर्व बाबींचा समावेश होतो. भारतात श्रमसंहिता नियम लागू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होती. चार कामगार कायदे संसदेने मंजूर केले गेले आहेत आणि भारतात अधिसूचित केले गेले आहेत सर्व देशासाठी हा कायदा लागू होणार आहे.
नव्या नियमानुसार कामगारांना ३० दिवसांनंतरच्या रजेवर अतिरिक्त पैशांव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना दोन दिवसांव्यतिरिक्त तीन दिवसांची रजा मिळणार आहे. परंतु आठवड्याच्या उर्वरित दिवसांमध्ये कामाचे तास वाढतील. नवीन कामगार कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत दीर्घकाळापासून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.