Jawa 42 vs Royal Enfield Classic 350: दुचाकी निर्माता कंपनी रॉयल एनफिल्डने तरुणांना खूप आकर्षित केले आहे. रॉयल एनफिल्ड अशा अनेक बाईक्स आहेत, ज्यांचे तरुणांमध्ये खूप क्रेझ आहे. परंतु, आता रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी जावा कंपनीची नवीन बाईक आज बाजारात दाखल होत आहे. ग्राहकांना या बाईकमध्ये स्टायलिश लूकसह ३३४ सीसी इंजिन मिळणार आहे. विशेष म्हणजे, ही बाईक आकर्षक रंग आणि दमदार फीचर्ससह लॉन्च होण्याची शक्यता आहे.
जावाची ही नवीन बाईक खडकाळ रस्त्यांवर हाय पॉवरसाठी ३० बीएचपीपेक्षा जास्त पॉवर जनरेट करेल, अशी माहिती लीक झाली आहे. परंतु, कंपनीने बाईकची किंमत आणि फीचर्सबाबत अद्याप कोणतीही माहिती शेअर केली नाही. ही बाईक २ लाख रुपयांच्या एक्स- शोरूम किंमतीत उपलब्ध होऊ शकते, असा अंदाज आहे. तर, बाइकमध्ये १३ लीटरची इंधन टाकी मिळू शकते. रायडरच्या सुरक्षेसाठी या बाइकच्या पुढील आणि मागील दोन्ही टायरमध्ये डिस्क ब्रेक असतील, असेही बोलले जात आहे.
जावा ४२ मध्ये ६ स्पीड गिअरबॉक्स मिळेले, ज्यामुळे बाईकला वेगाने धावण्यास मदत होईल. बाइकमध्ये गोल हेडलाइटसह एलईडी बल्ब दिला जाऊ शकतो. यात अलॉय व्हील्स मिळतील, जे नवीन पिढीसाठी आकर्षक लूक देतील. बाईकला टेलीस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन आणि मागील बाजूस ट्विन शॉक ऍब्जॉर्बर सस्पेन्शन देण्यात आले आहे, यामुळे रायडरला आरामदायी रायडिंगचा अनुभव मिळेल. ही एक हाय स्पीड बाईक आहे, जी १४० किमी/प्रतितास वेगाने धावेल.
जावा ४२ बाईक बाजारात उपलब्ध असलेल्या रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० ला टक्कर देईल. रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० मध्ये ३४९ सीसी इंजिन देण्यात आले आहे, जे सीरिज सिंगल सिलिंडर एअर-ऑईल कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ६ हजार १०० आरपीएमवर २०.२ बीएचपी पॉवर आणि ४ हजार आरपीएमवर २७ एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.या बाईकमध्ये १३ लीटरची इंधन टाकी मिळते. ही बाईक ३२ किलोमीटरपर्यंत मायलेज देते. बाइकमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० चे वजन १९५ किलो आहे. रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० ची किंमत १.९९ लाख ते २.३० लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. हेरिटेज, हेरिटेज प्रीमियम, सिग्नल्स, डार्क आणि क्रोम अशा पाच वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये उपलब्ध असलेली ही बाईक विविध रंगांमध्ये उपलब्ध आहे.