Jawa 350 Launched: नवीन जावा ३५० भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Jawa 350 Launched: नवीन जावा ३५० भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत

Jawa 350 Launched: नवीन जावा ३५० भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत

Jan 15, 2024 08:25 PM IST

New Jawa 350 Launched in India: आघाडीची मोटारसायकल निर्माता जावा कंपनीची जावा ३५० भारतात लॉन्च झाली.

Jawa 350
Jawa 350

Jawa 350 Specifications: आघाडीची मोटारसायकल निर्माता जावाने आज भारतात त्यांची नवीन जावा ३५० मोटारसायकल लॉन्च केली आहे, ज्याची एक्स शोरूम किंमत २.१५ लाख रुपये आहे. हे जावा स्टँडर्डचे अपडेटेड व्हेरियंट आहे, यासाठी ग्राहकांना १२ हजारपेक्षा जास्त प्रीमियम भरावा लागेल. जावाची बाजारातील रॉयल एनफील्ड ३५० सीसी मोटारसायकलशी स्पर्धा असेल.

जावा 350 मोटरसायकल तिच्या जुन्या मॉडेलच्या तुलनेत थोडी वेगळी आहे. परंतु, या मोटरसायकलचा एकूण आकार बदललेला नाही. या मोटारसायकलमध्ये काही लहान अपडेट्स देखील मिळत आहेत. ज्यामुळे ही मोटारसायकल पूर्वीपेक्षा अधिक मजबूत बनते. कंपनीने जावा ३५० नव्या मोटारसायकलच्या रंगात थोडा बदल केला आहे. ही मोटारसायकल पूर्वीप्रमाणे मरुन आणि ब्लॅक या दोन रंगात सादर करण्यात आली. यात नवीन ऑरेंज रंगचा समावेश केला आहे.

जावाच्या या मोटारसायकलमध्ये ३५० सीसी रेट्रो-थीम असलेले डायमेंशन अपडेट करण्यात आले आहेत. मोटारसायकलची ग्राउंड क्लीयरन्स १७८ मिमी आहे. तर, सीटची उंची ७९० मिमी आहे. मोटरसायकल लांब व्हीलबेससह येते, ज्याचे डायमेन्शन १ हजार ४४९ मिमी आहे. या मोटारसायकलच्या जुन्या मॉडेलचा ग्राउंड क्लीयरन्स १६५ मिमी आहे. तर, सीटची उंची ७६५ मिमी आणि व्हीलबेस १.३६८ मिमी आहे. नवीन जावा ३५० पूर्वीच्या मॉडेलपेक्षा लांब आहे. नवीन जावा ३५० हे मागील मॉडेलपेक्षा वजनदार आहे. जुन्या मॉडेलच्या १८२ किलोग्रॅमच्या तुलनेत १९४ किलोग्रॅम आहे.

कंपनीचा दावा आहे की, ही मोटारसायकल नवीन ड्युअल- क्रॅडल चेसिसवर तयार केली गेली, ज्यामुळे नवीन जावा ३५० मध्ये अतिरिक्त वजन वाढले. नवीन जावा ३५० मोटारसायकलमध्ये ३३४ सीसी, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन मिळते. नवीन इंजिन स्लिपर आणि असिस्ट क्लचसह ६ स्पीड ट्रान्समिशनशी जोडलेले आहे, जे २२ बीपीएचवर २८२ एनएम टॉर्क जनरेट करते.

Whats_app_banner