ITR Form news : इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्ममध्ये बदल; सर्व बँक खाती व रोख रकमेची माहिती द्यावी लागणार
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  ITR Form news : इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्ममध्ये बदल; सर्व बँक खाती व रोख रकमेची माहिती द्यावी लागणार

ITR Form news : इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्ममध्ये बदल; सर्व बँक खाती व रोख रकमेची माहिती द्यावी लागणार

Updated Dec 25, 2023 12:07 PM IST

ITR Form News : आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी प्राप्तिकर खात्यानं आत्ताच आयटीआर फॉर्म जारी केले आहेत. यात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.

New ITR Form
New ITR Form

Income Tax Return News : इन्कम टॅक्स फायलिंगमध्ये अधिक स्पष्टता आणि सुलभता आणण्यासाठी रिटर्न फायलिंगच्या प्रक्रियेत वेळोवेळी बदल केले जातात. प्राप्तिकर विभागानं २०२४-२५ च्या मूल्यांकन वर्षासाठी आयकर रिटर्न भरण्यासाठी ITR-1 (सहज) आणि ITR-4 (सुगम) हे फॉर्म जारी केले आहेत. यात काही बदल करण्यात आले आहेत. वर्षभरात मिळालेल्या रोख रकमेचा आणि सर्व बँक खात्यांचा तपशील करदात्यांना यातून द्यावा लागणार आहे.

ITR-1 (सहज) हा फॉर्म काही विशिष्ट करदात्यांसाठी आहे. ज्यांचं उत्पन्न ५० लाख रुपयांपर्यंत आहे आणि ज्यांना वेतन, घराची मालमत्ता, इतर स्रोत (व्याज) आणि कृषी उत्पन्नातून ५ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न येतं. अशा करदात्यांना २०२४-२५ मूल्यांकन वर्षासाठी जारी केलेल्या नवीन ITR फॉर्ममध्ये मागील आर्थिक वर्षातील त्यांच्या सर्व बँक खात्यांचा व त्यांच्या प्रकारांचा तपशील नमूद करावा लागणार आहे.

Azad Engineerig IPO : तब्बल ८० पट सबस्क्राइब झाला आयपीओ, सचिन तेंडुलकरला २३ कोटींचा फायदा होण्याची शक्यता

व्यावसायिक उत्पन्न ५० लाख रुपयांपर्यंत असलेल्या व्यक्ती, हिंदू संयुक्त कुटुंब आणि मर्यादित देय भागीदारी (LLP) प्रकारातील कंपन्या ITR - 4 (सुगम) दाखल करू शकतात. आता या फॉर्ममध्ये एक स्वतंत्र कॉलम समाविष्ट करण्यात आला आहे. त्यात वर्षभरात मिळालेल्या रोख रकमेचा तपशीलवार तपशील द्यावा लागेल. मागील वर्षी याच फॉर्ममध्ये क्रिप्टोकरन्सीसाठी वेगळा कॉलम जोडण्यात आला होता.

प्राप्तिकर विभागाचं म्हणणं काय?

प्राप्तिकर विभागाच्या म्हणण्यानुसार, ऑनलाइन रिटर्न भरताना फॉर्म-१ आणि फॉर्म-४ हे आधीच भरलेल्या माहितीसह उपलब्ध असतील. विभागाच्या ई-फायलिंग वेबसाइटवरील आयटीआर फॉर्ममध्ये एकूण उत्पन्न, एकूण बचत आणि टीडीएस इत्यादी आधीच भरलेल्या आकडेवारीसह येतात. करदात्याला फक्त ऑनलाइन फॉर्ममध्ये उपलब्ध माहिती फॉर्म-१६, वार्षिक माहिती पत्रक (AIS) आणि फॉर्म २६एएसशी जुळवावं लागणार आहे.

National Farmers Day : स्वस्त कर्जापासून सबसिडीपर्यंत… शेतकऱ्यांना फायदा देतात या ५ सरकारी योजना

लवकर आले आयटीआर फॉर्म

साधारणपणे आयटीआर फॉर्म मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीला जारी केले जातात. गेल्या वर्षी आयटीआर फॉर्म फेब्रुवारीमध्ये जारी करण्यात आले होते, परंतु यंदा करदात्यांना रिटर्न लवकर भरण्याची सुविधा देण्यासाठी हे फॉर्म डिसेंबरमध्येच उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Whats_app_banner