Electric Scooter : स्वदेसी E2go स्कूटरचा जलवा.. एका चार्जमध्ये १०० किमी सुस्साट!-new electric scooter e2go launched in india ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Electric Scooter : स्वदेसी E2go स्कूटरचा जलवा.. एका चार्जमध्ये १०० किमी सुस्साट!

Electric Scooter : स्वदेसी E2go स्कूटरचा जलवा.. एका चार्जमध्ये १०० किमी सुस्साट!

Oct 16, 2023 07:16 PM IST

E2go Electric Scooter - एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल १०० किलोमीटरपर्यंत सहज धावू शकणारी ई२गो ही इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात दाखल झाली आहे. काय आहे वैशिष्ट्ये, वाचा.

E2go Electric Scooter
E2go Electric Scooter

ओडीसी इलेक्ट्रिक व्हेईकल्स या दुचाकी उत्‍पादक कंपनीने नुकतेच ई२गो (E2go scooter) ही इलेक्ट्रिक स्‍कूटर बाजारात आणली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्णपणे स्‍वदेशात उत्‍पादन करण्‍यात आले आहे.

स्कूटरची दणकट संरचना आणि आकर्षक बनावट यामुळं ही स्कूटर नव्या युगाच्या रायडर्सच्या पसंतीस उतरेल अशी कंपनीला खात्री वाटते. एकदा चार्ज केल्यानंतर ई२गो (E2go Scooter) ग्रॅफिन ही इलेक्ट्रिक स्‍कूटर १०० किलोमीटरपर्यंत सहज धावू शकते. ई२गो स्कूटरमध्ये असलेल्या मजबूत बॅटरीमुळं रायडर निर्धास्त राहून खात्रीशीर प्रवास करू शकतो. स्कूटरमधली बॅटरी ८ तासांमध्‍ये पूर्ण चार्ज होते, असा दावा कंपनीने केला आहे.

ई२गो इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये (E2go electric scooter) रायडर्सच्या सोयीसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात यूएसबी चार्जर (USB Charger) अॅण्‍टी-थेफ्ट लॉक (Anti-Theft Lock)) तसेच कीलेस एण्‍ट्री डिजिटल स्‍पीडोमीटर (Keyless Entry Digital Speedometer) बसवण्यात आले आहे. कंपनीने ई२गो स्कूटरची तीन-वर्षांची वॉरंटी जाहीर केली आहे.

'भारतातील दुचाकी चालकांना अधिक सुसंगत आणि सोईचे वाहन उपलब्ध करून देणे आमचे लक्ष्य होते. त्यासाठी वेगळ्या स्टाइलची ई२गो इलेक्ट्रिक स्कूटर लॉंच करण्यात आली आहे. ' अशी माहिती ओडीसी इलेक्ट्रिक वेईकल्‍सचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी नेमिन वोरा यांनी दिली.

E2go new electric scooter
E2go new electric scooter

प्रत्‍येक राइडरच्‍या स्‍टाइलला जुळून येण्यासाठी ही ईलेक्ट्रिक स्कूटर मॅट ब्‍लॅक, कॉम्‍बॅट रेड, स्‍कार्लेट रेड, टील ग्रीन, अझुरे ब्‍ल्‍यू व कॉम्‍बॅट ब्‍ल्‍यू या आकर्षक रंगांमध्‍ये बाजारात उपलब्‍ध आहे. ग्राहकांना ही स्कूटर कंपनीच्‍या अधिकृत डिलर्ससोबतच फ्लिपकार्टवरून सुद्धा ऑर्डर करता येणार आहे. ग्रॅफिन ई२गोची बाजारातील किंमत एक्स शोरुम किंमत ६३,६५० रूपये असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या