New Rule From 1 January 2025: नवीन वर्ष सुरू होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. येणारं नवं वर्ष हे अनेक नवे बदल घेऊन येणार आहे. १ जानेवारी २०२५ पासून अनेक आर्थिक नियमावलीत बदल होणार आहेत, ज्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ शकतो. यात एलपीजी गॅसच्या किमतींपासून ते यूपीआयच्या नव्या पेमेंट नियमांत बदल होणार आहेत. या नव्या बदलांबाबत जाणून घेऊया सविस्तर...
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत सध्या ७३.५८ डॉलर प्रति बॅरल असल्याने जानेवारी २०२५ मध्ये एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढू शकतात. तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी दरांचा आढावा घेतात. सध्या घरगुती सिलिंडरची (१४.२ किलो) किंमत काही महिन्यांपासून स्थिर आहे, सध्या मुंबई व दिल्लीत हे दर ८०३ रुपये आहे.
१ जानेवारी २०२५ पासून बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्यांसाठी (एचएफसी) मुदत ठेवींशी संबंधित नियमात मोठे बदल होणार आहे. या बदलांचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होणार आहे.
१ जानेवारी २०२५ पासून करदात्यांना जीएसटीवाढीला समोर जावे लागणार आहे. यातील महत्त्वपूर्ण बदल म्हणजे अनिवार्य मल्टी-फॅक्टर सर्टिफिकेशन (एमएफए). जीएसटी पोर्टलचा वापर करणाऱ्या सर्व करदात्यांसाठी हळूहळू हा नियम लागू करण्यात येणार आहे. ज्यामुळे सुरक्षितता वाढेल. यापूर्वी वार्षिक एकूण उलाढाल (एएटीओ) २०० दशलक्ष रुपयांपेक्षा जास्त असलेल्या व्यवसायांनाच हा नियम लागू होता.
यूपीआय १२३ पेसाठी व्यवहार मर्यादा १ जानेवारी २०२५ पासून वाढविण्यात येणार आहे. यापूर्वी व्यवहाराची कमाल मर्यादा ५००० रुपये होती. आता १ जानेवारी २०२५ पासून ती वाढवून १०००० रुपये करण्यात येणार आहे. फीचर फोन वापरकर्त्यांसाठी रिझर्व्ह ऑफ इंडिया (RBI)नं यूपीआय १२३ पे सेवा सुरु केली आहे. याच्या व्यवहार मर्यादेत वाढ करण्यात आली आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे (ईपीएफओ) नोंदणी केलेल्या सात कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला एक खास भेट मिळण्याची शक्यता आहे, कारण केंद्र सरकार नियमित डेबिट कार्डप्रमाणे एटीएममधून पीएफ काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या विचारात आहे.
आरबीआयने १ जानेवारी २०२५ पासून शेतकऱ्यांना विनाहमी कर्जाची मर्यादा २ लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मर्यादा १.६० लाख रुपये होती.
१ जानेवारी २०२५ पासून सेन्सेक्स, बँकेक्स आणि सेन्सेक्स५० ची मासिक मुदत दर महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी ठरणार आहे. सेन्सेक्स, बँकेक्स आणि सेन्सेक्स ५० च्या एक्सपायरी डेटमध्ये १ जानेवारी २०२५ पासून सुधारणा करण्यात येणार असल्याचे मुंबई शेअर बाजाराने नुकत्याच काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. बीएसईने म्हटले आहे की, सेन्सेक्ससाप्ताहिक करार शुक्रवारऐवजी दर आठवड्याच्या मंगळवारी संपुष्टात येतील. सेन्सेक्स, बँकेक्स आणि सेन्सेक्स ५० चे मासिक करार दर महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी संपुष्टात येणार आहेत.
जानेवारी २०२५ मध्ये कारच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे वाहन खरेदी करणे महाग होणार आहे. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, ह्युंदाई, महिंद्रा, होंडा आणि किया सह अनेक आघाडीच्या वाहन निर्मात्या कंपन्यांसह मर्सिडीज-बेंझ, ऑडी आणि बीएमडब्ल्यू सारख्या लक्झरी ब्रँड १ जानेवारी २०२५ पासून वाहनांच्या किंमतीत २ ते ४ टक्क्यांनी वाढ करणार आहेत. उत्पादन खर्च, मालवाहतुकीच्या शुल्कात झालेली वाढ, वाढते वेतन आणि परकीय चलनातील अस्थिरता यामुळे कार उत्पादकांनी ही वाढ केली आहे.
संबंधित बातम्या