netflix scam: जर तुम्ही नेटफ्लिक्स युजर असाल तर तुम्ही आता सावध राहणे गरजेचे आहे. कारण सायबर चोरट्यांनी नेटफ्लिक्स वापरकर्त्यांना आता लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. सायबर गुन्हेगार नेटफ्लिक्स युजर्सची आर्थिक फसवणूक करत असून त्यांना लाखोंचा चुना लावत आहे. ब्रिटडिफेंडरच्या सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी नेटफ्लिक्सच्या मोठ्या घोटाळ्याबाबत युजर्सना सतर्क केलं आहे. सायबर तज्ञानुसार, या घोटाळ्यात सायबर गुन्हेगार युजर्सना फेक मेसेज पाठवून त्यांची आर्थिक माहिती अॅक्सेस करत आहेत. नेटफ्लिक्स युजर्सच्या बँक खात्याच्या डिटेल्ससह क्रेडिट कार्डची माहिती मिळवणे हे हॅकर्सचे लक्ष्य असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नागरिकांची फसवणूक केली जात आहे. ही फसवणुक कशी केली जाते याची माहिती घेऊयात.
हा घोटाळा सप्टेंबरमध्ये सुरू झाला असून अनेक नेटफ्लिक्स वापरणाऱ्या नागरिकांची सायबर चोरट्यांनी फसवणूक केली आहे हा घोटाळा अजूनही सुरू असून नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. सायबर चोरट्यांनी जर्मनी, अमेरिका आणि स्पेनसह जगभरातील २३ देशांतील युजर्सना टार्गेट केलं आहे. रिपोर्टनुसार, सायबर गुन्हेगार युजर्सना बक्षिसे जिंकण्यासाठी फेक लिंक पाठवत आहेत. यातून नेटफ्लिक्स अकाऊंटचा अॅक्सेस घेत वापरकर्त्यांच्या बँक खात्याची माहिती हॅक केली जात आहे.
हॅकर्स फसवणुक करण्यासाठी वापरकर्त्यांच्या फोनवर मॅसेज पाठवत आहेत. खालील प्रकारे हे मॅसेज पाठवण्यात येत असून जर तुम्हाला ते आले असतील तर वेळीच सावध व्हा.
1- 'Netflix: There was an issue processing your payment. To keep your services active, please sign in and confirm your details at: http://account-details.com'
2- 'Netflix: There was a failure in your recent payment, affecting your ongoing services. Check the details at 78hex4w.vitilme.info'
या फसव्या लिंकवर क्लिक केल्यास नेटफ्लिक्सची फसवी लिंक ओपन होते. लिंक केल्यावर युझर्सच्या नेटफ्लिक्स खात्याचा अॅक्सेस सायबर चोरट्यांना मिळतो. या माध्यमातून चोरटे त्यांच्या खात्यातून मोठी रक्कम लंपास करत असल्याचं उघड झालं आहे. युजर्सचे युजरनेम, पासवर्ड आणि क्रेडिट कार्डडिटेल्स या फसव्या साईटवर टाकण्यास सांगून हॅकर्स युजर्सच्या फायनान्शियल डिटेल्सद्वारे फसवणूक करतात.
१. नेटफ्लिक्स एसएमएसमध्ये अकाऊंटशी संबंधित नोटिफिकेशन पाठवत नाही हे नेहमी लक्षात ठेवा.
२- साईटचे स्पेलिंग तपासा. या माध्यमातून बनावट साईट ओळखली जाऊ शकते. व्याकरण संदेशांद्वारे फेक मेसेज ओळखले जाऊ शकतात.
३- हॅकर्स युजर्सना जाळ्यात अडकवण्यासाठी अकाऊंट सुरक्षेबाबत तातडीने कारवाई करण्यास भाग पाडतात.
१. कोणताही संशयास्पद मेसेज ताबडतोब डिलीट करा.
२- नेटफ्लिक्स अकाऊंटबद्दल माहितीसाठी कंपनीच्या अॅप किंवा अधिकृत वेबसाईटवर जा.
३ अकाऊंटच्या सिक्युरिटीसाठी एक मजबूत पासवर्ड सेट करा.
४- सुरक्षा सुधारण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सक्षम करा.