Billionaire List 2024 : तीन दिवसांत जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत तीन मोठे बदल झाले आहेत. यापूर्वी इलॉन मस्क यांच्याकडे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मुकुट होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी जेफ बेझोसने त्याच्याकडून नंबर वन अब्जाधीशाचा मुकुट हिसकावून घेतला आहे. बर्नार्ड अर्नॉल्ट यांनी जेफ बेझोस यांना देखील मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती व्यक्ति होण्याचा मान मिळवला आहे.
जगातील श्रीमंतांच्या यादीत गेल्या काही दिवसांपासून मोठे चढ उतार होत आहेत. पहिल्या क्रमांकावर राहण्यासाठी मोठी स्पर्धा लागली आहे. हा मान जेफ बेझोस यांनी पटकावला होता, बेझोस हे १९६ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या यादीत बर्नार्ड अर्नॉल्ट १९७ अब्ज डॉलर्ससह अव्वल स्थान पटकावले आहेत. याचा अर्थ आता कोणत्याही अब्जाधीशाची संपत्ती २०० अब्ज डॉलर्स नाही.
तीन दिवसांपूर्वी, ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलोन मस्क हे आता तिसऱ्या स्थानावर गेले आहेत. सोमवारी त्यांच्या मालमत्तेमध्ये १७.६ अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. बुधवारी, त्याच्या संपत्तीतून आणखी ३ अब्ज डॉलर्सची घट झाली. इलॉन मस्क आता ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकात १८९ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहेत.
या वर्षी मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग कमाईत पहिल्या क्रमांकावर आहे. झुकरबर्गने ४९.९ अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. जगातील चौथ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीकडे सध्या १७८ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. बिलगेट्स पाचव्या क्रमांकावर आहे. या कालावधीत त्यांची संपत्ती ७.२६ अब्ज डॉलरने वाढून १४८ अब्ज डॉलर झाली आहे.
एकूण १३९ अब्ज डॉलर्स संपत्तीसह, स्टीव्ह बाल्मर ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकात सहाव्या क्रमांकावर आहेत. तर वॉरन बफे हे या यादीत सातव्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती १३३ अब्ज डॉलर्स आहे. आठव्या स्थानावर १२७ अब्ज डॉलर्ससह लॅरी एलिसन आहेत. लॅरी पेज नवव्या स्थानावर असून त्यांची एकूण संपत्ती ही १२१ अब्ज डॉलर्स आहे. सर्जी ब्रिन ११५ अब्ज डॉलरसह दहाव्या स्थानावर आहेत.