Share Market News Updates : नीलम लिनन्स अँड गारमेंट्स या छोट्या कंपनीच्या शेअरमध्ये १० दिवसांत मोठी वाढ झाली आहे. नीलम लिनन्स अँड गारमेंट्सचा शेअर सोमवारी २ टक्क्यांनी वधारून ५१.५० रुपयांवर पोहोचला. त्यामुळं अवघ्या दहा दिवसांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत.
कंपनीचा आयपीओ ८ नोव्हेंबर २०२४ रोजी बोलीसाठी खुला होता आणि १२ नोव्हेंबरपर्यंत खुला होता. तर, कंपनीचे शेअर्स १८ नोव्हेंबर रोजी बाजारात सूचीबद्ध झाले होते. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत २४ रुपये होती. त्या इश्यू प्राइसच्या तुलनेत कंपनीचे शेअर्स ११० टक्क्यांनी वधारले आहेत.
नीलम लिनन्स अँड गारमेंट्सचा शेअर १८ नोव्हेंबर २०२४ रोजी कंपनीचा शेअर ६६.८७ टक्क्यांच्या प्रीमियमसह ४०.०५ रुपयांवर लिस्ट झाला. लिस्टिंगच्या दिवशी कंपनीचा शेअर ३८.०५ रुपयांवर बंद झाला. लिस्टिंग झाल्यापासून कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली वाढ दिसून येत आहे. नीलम लिनन्स अँड गारमेंट्सचा शेअर २ डिसेंबर २०२४ रोजी ५१.५० रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ५३.३० रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ३६.१५ रुपये आहे.
आयपीओ नीलम लाइन्स अँड गारमेंट्सचा आयपीओ एकूण ९१.९७ पट सब्सक्राइब झाला होता. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा ५७.८२ पट सब्सक्राइब झाला होता. तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार (एनआयआय) श्रेणीत २७३.४७ पट बोली लागली होती. तर क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (क्यूआयबी) श्रेणीत १५.४० पट सब्सक्राइब झाला होता. आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना केवळ १ लॉटसाठी अर्ज करता आला. आयपीओच्या एका लॉटमध्ये ६००० शेअर्स होते. म्हणजेच रिटेल गुंतवणूकदारांना कंपनीच्या आयपीओमध्ये १,४४,००० रुपयांची गुंतवणूक करावी लागली.
नीलम लिनन्स अँड गारमेंट्स या कंपनीचा व्यवसाय २०१० मध्ये सुरू झाला. कंपनी जगभरात उच्च दर्जाची सॉफ्ट होम फॅशन उत्पादनं बनवते आणि निर्यात करते. सफायर लिनन्स अँड गारमेंट्स बेडशीट, उशी कव्हर, ड्युवेट कव्हर, टॉवेल, रग, शर्ट आणि इतर कपड्यांसह विविध उत्पादनं ऑफर करते.
संबंधित बातम्या