Neelam Linens and Garments share price : नीलम लिनन्स अँड गारमेंट्स या चिमुकल्या कंपनीचे शेअर्स सध्या रॉकेटच्या वेगानं धावत आहेत. मंगळवारी कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून ४८.४० रुपयांवर पोहोचला. या कंपनीच्या शेअर्सना सोमवारी पाच टक्क्यांचं अप्पर सर्किट लागलं. अवघ्या ६ दिवसांत कंपनीच्या शेअरची किंमत दुप्पट झाली आहे.
नीलम लिनन्स अँड गारमेंट्सने १८ नोव्हेंबर २०२४ रोजी शेअर बाजारात प्रवेश केला. आयपीओ ऑफरमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत २४ रुपये होती. मंगळवारी कंपनीचा शेअर ४८ रुपयांच्या वर पोहोचला आहे.
नीलम लिनन्स अँड गारमेंट्सचा आयपीओ ८ नोव्हेंबर २०२४ रोजी खुला झाला होता आणि १२ नोव्हेंबरपर्यंत खुला राहिला. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत २४ रुपये होती. कंपनीचे शेअर्स १८ नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात लिस्ट झाले. हा शेअर ४०.०५ रुपयांवर लिस्ट झाला. लिस्टिंगच्या दिवशी कंपनीचा शेअर ३८.०५ रुपयांवर बंद झाला. २६ नोव्हेंबर रोजी कंपनीचा शेअर ४८.४० रुपयांवर पोहोचला. २४ रुपयांच्या इश्यू प्राइसच्या तुलनेत ६ दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये १०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
नीलम लीनन्स अँड गारमेंट्सचा आयपीओ एकूण ९१.९७ पट सबस्क्राइब झाला होता. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा ५७.८२ पट सब्सक्राइब झाला होता. तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार (एनआयआय) श्रेणीत २७३.४७ पट बोली लागली. कंपनीच्या आयपीओमध्ये क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा (QIB) कोटा १५.४० पट सब्सक्राइब झाला होता. नीलम लिनन्स अँड गारमेंट्सच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना केवळ १ लॉटसाठी अर्ज करता आला. आयपीओच्या एका लॉटमध्ये ६००० शेअर्स होते. म्हणजेच रिटेल गुंतवणूकदारांना कंपनीच्या आयपीओमध्ये १.४४ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागली.