मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Zee Sony Merger : झी सोनी विलिनीकरणाचा मार्ग मोकळा; शेअर १६ टक्क्यांनी उसळला!

Zee Sony Merger : झी सोनी विलिनीकरणाचा मार्ग मोकळा; शेअर १६ टक्क्यांनी उसळला!

Aug 10, 2023 06:47 PM IST

Zee Sony Merger : राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाच्या (एनसीएलटी) मुंबई खंडपीठाने गुरूवारी झी सोनीच्या विलीनीकरणाला अंतिम मंजूरी दिली आहे.

zee sony merger HT
zee sony merger HT

Zee Sony Merger : राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाच्या मुंबई खंडपीठाने झी सोनीच्या विलीनीकरणाला मंजूरी दिली आहे. या विलीनीकरणातील सर्व अडथळे आता दूर झाले आहेत.१० जुलैला न्यायिक सदस्य एच व्ही सुब्बाराव आणि तांत्रिक सदस्य मधू सिन्हा यांच्या खंडपीठाने विलीनीकरणाच्या प्रकरणांमध्ये आदेश कायम ठेवला आहे. या सकारात्मक वृत्ताने झी एंटरटेन्मेंटचे शेअर्स राॅकेटप्रमाणे पळू लागले.आठवड्याच्या चौथ्या ट्रेडिंग सेशनमध्ये गुरूवारी झी एंटरटेन्मेंटचा शेअर १६ टक्क्यांपर्यंत वाढला. कंपनीचा शेअर २८१.६० रुपयांवर ट्रेड करत होते.

ट्रेंडिंग न्यूज

या मेगाविलीनीकरणामध्ये एक महत्त्वपूर्ण मंजूरी एनसीएलटीने दिली आहे. १० अब्ज डाॅलर्सचे मिडिया व्हेंचर तयार करणे हा यामागचा उद्देश आहे. अनेक लेंडर्सनी एनसीएलटीमध्ये झी सोनी विलीनीकरणाला हरकत घेतली होती. कंपनीने आयडीबीआय बँक, इंडसएंड बँक, इंडियन परफाॅर्मिंग राईट्स सोसायटीसह सामंजस्य करार केला होता.

तोट्यात आहे कंपनी.

प्रमुख मिडिया कंपनी झी एंटरटेन्मेंट एंटरप्राईजेस लिमिटेडला चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वार्षिक आधारावर ६३.४२ कोटी रुपयांचे नुकसान झाले. कल्चर मॅक्ससहित विलीनीकरणांचा अतिरिक्त खर्चामुळे नुकसान झाले आहे. कंपनीने सांगितले की, कंपनीने गेल्या वर्षी समान कालावधीत १०६.६० कोटींचा नफा कमावला. दरम्यान, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत उत्पन्न ६.४६ टक्क्यांनी वाढून १९९८.२८ कोटी रुपये झाला आहे.

WhatsApp channel
विभाग