Bonus shares : बोनस शेअर्सचा लाभ घेण्याची आज शेवटची संधी; एनबीसीसीच्या शेअरमध्ये प्रचंड वाढ
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Bonus shares : बोनस शेअर्सचा लाभ घेण्याची आज शेवटची संधी; एनबीसीसीच्या शेअरमध्ये प्रचंड वाढ

Bonus shares : बोनस शेअर्सचा लाभ घेण्याची आज शेवटची संधी; एनबीसीसीच्या शेअरमध्ये प्रचंड वाढ

Published Oct 07, 2024 10:01 AM IST

NBCC share price : सरकारी कंपनी एनबीसीसीनं केलेल्या बोनस शेअर्सच्या घोषणेनंतर कंपनीचे शेअर घेण्यासाठी झुंबड उडाली आहे.

बोनस शेअर्सचा लाभ घेण्यासाठी आज शेवटची संधी; एनबीसीसीच्या शेअरमध्ये प्रचंड वाढ
बोनस शेअर्सचा लाभ घेण्यासाठी आज शेवटची संधी; एनबीसीसीच्या शेअरमध्ये प्रचंड वाढ

NBCC bonus shares : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी एनबीसीसीच्या शेअरमध्ये आज ४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीनं जाहीर केलेल्या बोनस शेअर्सचा लाभ घेण्यासाठी आज, म्हणजेच ७ ऑक्टोबर ही शेवटची तारीख असल्यामुळं शेअर्समध्ये ही तेजी दिसत आहे. हा शेअर खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली आहे.

एनबीसीसीच्या संचालक मंडळानं ३१ ऑगस्ट २०२४ रोजी घेतलेल्या बैठकीत १:२ या प्रमाणात बोनस शेअर्सच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. त्यानुसार कंपनीच्या शेअरहोल्डर्सना प्रत्येक २ शेअरवर एक शेअर फ्री मिळणार आहे. बोनस शेअर्सचा लाभ घेण्यासाठी सोमवार, ७ ऑक्टोबर २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे.

काय आहे शेअरची स्थिती?

एनएसईवर ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजून ५४ मिनिटांनी एनबीसीसीच्या शेअरचा भाव ३.७५ टक्क्यांनी वधारून ११६.९० रुपयांवर व्यवहार करत होता. एनएसईनुसार, कंपनीचं बाजार भांडवल ३१,६१७ कोटी रुपये आहे. एनबीसीसीच्या शेअरची किंमत २८ ऑगस्ट २०२४ रोजी ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली होती.

कंपनीच्या निवेदनानुसार, बोनस शेअर्स जारी करताना एनबीसीसीच्या फ्री रिझर्व्हमधून ९० कोटी रुपये वापरले जातील. ३१ मार्च २०२४ च्या लेखापरीक्षण केलेल्या वित्तीय स्टेटमेंटमध्ये तशी तरतूद करण्यात आली आहे. कंपनीकडं सध्या भांडवलासाठी १,९५९ कोटी रुपयांचा अतिरिक्त व राखीव निधी आहे. 

काय आहे कंपनीची योजना?

बोनस शेअर्सच्या माध्यमातून प्रत्येक १ रुपया फेस व्हॅल्यूचे ९० कोटी इक्विटी शेअर्स इश्यू करून एकूण भागभांडवल १८० कोटी शेअर्सवरून २७० कोटी शेअर्सपर्यंत वाढवण्याची एनबीसीसीची योजना आहे. बोनस शेअर्सचं वितरण ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे. बोनस देण्यासंदर्भातील सर्व आवश्यक तपशील एनबीसीसीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner