एनबीसी लिमिटेडला बिहारच्या नितीशकुमार सरकारकडून १२६१ कोटी रुपयांचे काम मिळाले आहे. या कामानंतर एनबीसीसीच्या शेअरमध्ये २.५२ टक्क्यांची वाढ दिसून आली. ज्यामुळे सोमवारी शेअर्सचा भाव १७८.५० रुपयांच्या पातळीवर पोहोचला.
कंपनीने शेअर बाजारांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, दरभंगा येथील एम्सशी संबंधित काम बिहारच्या आरोग्य मंत्रालयाकडून 1261 कोटी रुपयांना प्राप्त झाले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला कंपनीने एमटीएनएलसोबत १६०० कोटी रुपयांचा सामंजस्य करार केला होता.
नफ्यात ३८ टक्के वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा नफा १०७.२० कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत एनबीसीसी लिमिटेडचा नफा ७७.४० कोटी रुपये होता. एप्रिल ते जून या कालावधीत या कंपनीचा एकूण महसूल २१९७.८० कोटी रुपये होता. तर याच कालावधीत ही कमाई १९७४ कोटी रुपये होती.
गेल्या वर्षभरात एनबीसीसी लिमिटेडच्या शेअरच्या किमतीत २०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी ६ महिने हा शेअर ठेवला आहे, त्यांना ५० टक्क्यांहून अधिक फायदा झाला आहे. मात्र, गेल्या महिनाभराचा काळ गुंतवणूकदारांसाठी चांगला गेला नाही. या काळात शेअर्सच्या किंमतीत 2 टक्क्यांहून अधिक घसरण पाहायला मिळाली आहे.
एनबीसीसी लिमिटेडचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २०९.७५ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ५६.७१ रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप 31,797 कोटी रुपये आहे. एनबीसीसीमध्ये सरकारचा एकूण हिस्सा ६१ टक्क्यांहून अधिक आहे.
(हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजार जोखमीच्या अधीन आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. )