नवरत्न कंपनीला मिळाल्या तब्बल ३०० कोटींच्या वर्क ऑर्डर, शेअरचा भाव १०० रुपयांच्याही खाली
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  नवरत्न कंपनीला मिळाल्या तब्बल ३०० कोटींच्या वर्क ऑर्डर, शेअरचा भाव १०० रुपयांच्याही खाली

नवरत्न कंपनीला मिळाल्या तब्बल ३०० कोटींच्या वर्क ऑर्डर, शेअरचा भाव १०० रुपयांच्याही खाली

Dec 21, 2024 11:52 AM IST

NBCC Stock Price : नवरत्न कंपनी एनबीसीसीला तब्बल ३०० कोटी रुपयांचं कंत्राट मिळालं आहे. कंपनीच्या शेअरचा भाव १०० रुपयांपेक्षा कमी आहे.

नवरत्न कंपनीला मिळालं तब्बल ३०० कोटींचं कंत्राट, शेअरचा भाव १०० रुपयांच्याही खाली
नवरत्न कंपनीला मिळालं तब्बल ३०० कोटींचं कंत्राट, शेअरचा भाव १०० रुपयांच्याही खाली

Share Market News In Marathi : नवरत्न कंपनी नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनीनं (एनबीसीसी) शुक्रवारी नव्या वर्क ऑर्डरची माहिती दिली. एनबीसीसीला तब्बल ३०० कोटींच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. त्यामुळं कंपनीच्या शेअरकडं गुंतवणूकदारांची नजर वळली आहे.

एनबीसीसीला ऑईल इंडिया लिमिटेडकडून २००.६० कोटी रुपयांचं काम मिळालं आहे. कंपनीला ऑईल हॉस्पिटल बांधायचं आहे. याशिवाय एनबीसीसीची उपकंपनी असलेल्या एचएससीसी (इंडिया) ला ९८.१७ कोटी रुपयांचं काम मिळालं आहे. या महिन्याच्या सुरुवातीला एनबीसीसीला ६०० कोटी रुपयांचं काम मिळालं होतं.

सप्टेंबरच्या तिमाहीत चांगला नफा

कंपनीच्या आर्थिक स्थिती तुलनेनं चांगली आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीला एकूण निव्वळ नफा १२५.१० कोटी रुपये झाला आहे. वार्षिक आधारावर एनबीसीसी लिमिटेडच्या निव्वळ नफ्यात ५२.८० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ८१.९० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल २४५८.७० कोटी रुपये होता.

शेअर बाजारात एनबीसीसीची कामगिरी कशी?

गेल्या आठवडाभरात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत ४.८६ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर शेअरच्या किंमतीत ६ महिन्यांत १३.३५ टक्क्यांची घसरण झाली आहे. मात्र, तरीही गुंतवणूकदारांना ८८ टक्के परतावा मिळाला आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १३९.९० रुपये आहे. ज्या गुंतवणूकदारांनी २ वर्षे हा शेअर ठेवला आहे, त्यांना आतापर्यंत २४० टक्के फायदा झाला आहे. चालू आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, २० डिसेंबर रोजी कंपनीचा शेअर एनएसईवर ३.२१ टक्क्यांनी घसरून ९३.९८ रुपयांवर बंद झाला.

या कंपनीत सरकारचा ६१.८० टक्के हिस्सा आहे. तर, सर्वसामान्य जनतेचा वाटा २५.०४ टक्के आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner