NBCC (India) news : नवरत्न कंपनी एनबीसीसी (इंडिया) लिमिटेडला तब्बल ४४८.७४ कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. एनबीसीसीला गेल, न्यू इंडिया अॅश्युरन्स आणि प्रधान मुख्य आयकर आयुक्त, यूपी (पश्चिम) आणि उत्तराखंड, कानपूर कडून या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत या कंपनीच्या शेअरमध्ये ३१० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
सरकारी कंपनी गेलकडून एबीसीसी इंडियाला ५० कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. कंपनीला न्यू इंडिया अॅश्युरन्सकडून दुसरी ऑर्डर मिळाली आहे. तिचं मूल्य १३६ कोटी रुपये आहे. प्रत्यक्ष कर इमारत आणि निवासी संकुलाच्या बांधकामासाठी एनबीसीसीला तिसरं कंत्राट मिळालं आहे. तिची ऑर्डर व्हॅल्यू २६२.७४ कोटी रुपये आहे. गेल्या आठवड्यात एनबीसीसीला ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डकडून ५०० कोटी रुपयांची बांधकाम ऑर्डर मिळाली. हिंदुस्थान स्टीलवर्क्स कन्स्ट्रक्शन लिमिटेड (HSCL) या उपकंपनीला याआधीच बेंगळुरूमध्ये ६५ कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे.
गेल्या दोन वर्षांत एनबीसीसीच्या शेअरमध्ये ३१० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. नवरत्न कंपनीचा शेअर ११ नोव्हेंबर २०२२ रोजी २३.२० रुपयांवर होता. १२ नोव्हेंबर २०२४ रोजी सरकारी कंपनीचा शेअर ९६.४५ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास ११० टक्क्यांची वाढ झाली आहे. एनबीसीसीचा शेअर १३ नोव्हेंबर २०२३ रोजी ४५.४३ रुपयांवर होता. १२ नोव्हेंबर २०२४ रोजी कंपनीचा शेअर ९६.४५ रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर १३९.८३ रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ४२.५३ रुपये आहे.
एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड या नवरत्न कंपनीने गेल्या काही वर्षांत दोनवेळा बोनस शेअर्स दिले आहेत. कंपनीनं फेब्रुवारी २०१७ मध्ये १:२ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले आहेत. म्हणजेच कंपनीने प्रत्येक २ शेअरमागे १ बोनस शेअर दिले होते. त्याचबरोबर या कंपनीनं ऑक्टोबर २०२४ मध्ये १:२ या प्रमाणात बोनस शेअरही दिले आहेत.