मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Mutual funds : म्युच्युअल फंडधारकांसाठी गुडन्यूज! नवा नियम १ फेब्रुवारीपासून लागू

Mutual funds : म्युच्युअल फंडधारकांसाठी गुडन्यूज! नवा नियम १ फेब्रुवारीपासून लागू

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 30, 2023 05:34 PM IST

Mutual funds : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली बातमी. भारतात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या फंड हाऊसेसनी फंडातील पैसे काडण्यासाठी एक नवा नियम जारी केला आहे. असोसिएशन आँफ म्यच्युअल फंडाने (अॅम्फी) ही माहिती दिली.

Mutual funds HT
Mutual funds HT

Mutual funds : म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीचा लाॅक इन कालावधी आता दोन दिवसांवर आला आहे. येत्या १ फेब्रुवारीपासून याबाबतचा नवा नियम लागू होणार आहे. आता म्युच्युअल फंडात केलेल्या गुंतवणुकीचे पैसे तीन दिवसांच्या आत खातेदाराच्या खात्यात जमा करावेत, असे आदेश सेबीने जारी केले आहेत.

याआधी आपल्या फंडाचे पैसे खात्यात जमा होण्यासाठी किमान १० दिवसांची प्रतीक्षा करावी लागत होती. तो कालावधी आता कमी करण्यात आला आहे. कर्जावरील वाढत्या व्याजदरांनुळे देशातल्या गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडमधून ठेवी काढून घेतल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात ६५ कोटींच्या ठेवी म्युच्युअल फंडमधून काढून घेतल्याचे समोर आले आहे.

कोणत्याही म्युच्युअल फंडातून पैसे काढताना फंडाच्या लाॅक इन कालावधीनंतर रक्कम तुमच्या हातात मिळते. अनेक म्युच्युअल फंडातून कोणत्याही वेळी आपण आपली गुंतवणूक काढून घेऊ शकतो. म्युच्युअल फंडातून पैसे काढणे या प्रक्रियेला रिडेम्प्शन म्हणतात.यावेळी त्या फंडाच्या एनएव्हीप्रमाणे पैसे मिळतात.

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम फंडांचा मॅच्युरिटी लॉक-इन कालावधी ३ वर्षांचा आहे. हा कालावधी संपल्यानंतर गुंतवणूकदार अंशतः किंवा पूर्ण रक्कम काढून शकतो. काही म्युच्युअल फंड योजना ठराविक कालावधीच्या आधीच पैसे काढल्यास एक्झिट लोड आकारतात. तसेच डेट फंडातून ३६ महिन्यांच्या आत पैसे काढल्यास अल्पकालीन भांडवली नफा कर आकारला जातो. मिळालेल्या परताव्यावर तुमच्या स्लॅब दरांनुसार कर आकारला जातो.

भारतीय शेअर बाजाराने कोणत्याही खात्यातून पैसे काढण्यासाठी टी प्लस वन या नियमाचे पालन केले जात होते. शेअर सेटलमेंटची मुदत कमी झाली होती. पण आता या नव्या नियमामुळे म्युच्युअल फंड धारकांना फायदा होणार आहे, असे अॅम्फीचे अध्यक्ष ए बालसुब्रमण्यम यांनी सांगितले.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग