मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Mutual Funds : या म्युच्युअल फंडाने टाटा कम्युनिकेशनचे खरेदी केले शेअर्स, गुंतवणूकदार मालामाल

Mutual Funds : या म्युच्युअल फंडाने टाटा कम्युनिकेशनचे खरेदी केले शेअर्स, गुंतवणूकदार मालामाल

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 19, 2023 05:33 PM IST

Mutual Funds : या म्युच्युअल फंडाने टाटा कम्युनिकेशन कंपनीच्या शेअर्सची बल्कमध्ये खरेदी केली आहे. त्यामुळे टाटा कम्युनिकेशनच्या शेअर्सची किंमत १५०० रुपयांपेक्षा अधिक वाढण्याची शक्यता आहे.

Mutual fund_HT
Mutual fund_HT

Mutual Funds : जर तुम्ही शेअर्समध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी संबंधित शेअर्समध्ये बड्या गुंतवणूकीनंतर गुंतवणूक कऱण्यास प्राधान्य देत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. डीएसपी म्युच्युअल फंडाने टाटा कम्युनिकेशनच्या शेअर्सची खरेदी केली आहे. टाटा ग्रुपच्या या स्टाॅक्सनी ताबडतोब रिटर्न्स दिले आहेत.

डीएसपी म्युच्युअल फंडाने ३१ डिसेंबरला २०२२ ला ५५०० शेअर्सची खरेदी केली होती. टाटा कम्युनिकेशनच्या शेअर होल्डिंग्जच्या पॅर्टन्समध्ये ही गोष्ट समोर आली आहे. त्यामुळे छोट्या गुंतवणूकदारांनी या शेअर्समध्ये पैसे गुंतवावे का असा प्रश्न उपस्थित होतोय.

तज्ज्ञांचे म्हणणे

च्वाईस ब्रोक्रिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगाडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार्ट पॅर्टन्समध्ये अपसाईट मुव्हमेंट दिसत आहे. १३५० रुपयांच्या स्टाॅप लाॅस लक्षात घेऊन या शेअर्समध्ये गुंतवणूक करता येऊ शकते. टाटा कम्युनिकेशनचे शाॅर्टटर्म टार्गेट प्राईस १४५० ते १५०० च्या दरम्यान आहे.

शेअऱ बाजारातील स्थिती

टाटा कम्युनिकेशनच्या शेअर्सचा भाव १.१५ टक्के घसरणीनंतर १३७१.६० रुपयांच्या पातळीवर येऊन स्थिरावला आहे. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये ४.५४ टक्के तेजी पहायला मिळाली आहे. तर ६ महिने आधी ज्या गुंतवणूकदारांनी या शेअर्सची खरेदी केली असेल त्यांना अंदाजे ३८ टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न्स मिळावे आहेत. कंपनीची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी अंदाजे १५४० रुपये आहे. तर ५२ आठवड्याची निचांकी पातळी ८५६.२५ रुपये आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये टाटा समुहातील या कंपनीच्या शेअर्सनी तब्बल ५०० टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न्स दिले आहेत.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग