मराठी बातम्या  /  business  /  Mutual Fund : ३० वर्षात ५० कोटींचा फंड होणार तयार, जाणून घ्या कसा आहे हा फंडा
mutual funds HT
mutual funds HT

Mutual Fund : ३० वर्षात ५० कोटींचा फंड होणार तयार, जाणून घ्या कसा आहे हा फंडा

29 March 2023, 16:43 ISTKulkarni Rutuja Sudeep

Mutual Fund : म्युच्युअल फंडाच्या एसआयपी माध्यमातून ३० वर्षात ५० कोटींचा फंड जमा करण्यासाठी कोणता नियम वापराल हे जाणून घ्या.

Mutual Fund : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे धोकादायक असू शकतं, परंतु मासिक सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनने गुंतवणूकदारासाठी जोखीम कमी केली जाते. कारण गुंतवणुकीच्या कालावधीत इक्विटी परतावा सरासरी असतो. म्हणूनच, दीर्घकालीन गुंतवणूकदारासाठी, म्युच्युअल फंड एसआयपी हा एक चांगला गुंतवणूक पर्याय आहे. एसआयपीमध्ये गुंतवणूकदाराला तेजी किंवा मंदी यांची चिंता करण्याची गरज नसते. ५० कोटी रुपयांचा निधी तयार करण्यासाठी तुम्ही एसआयपीद्वारे किती गुंतवणूक करू शकता हे गणित समजून घेऊ.

ट्रेंडिंग न्यूज

वार्षिक आधारावर गुंतवणूक वाढवा

तथापि, गुंतवणूकदारांना स्टेप-अप धोरण वापरण्याचा सल्ला दिला जातो. या धोरणांतर्गत तुमचे वार्षिक उत्पन्न वाढते, त्याच प्रमाणात तुम्ही तुमची एसआयपी रक्कम वाढवू शकता. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने वयाच्या ३० व्या वर्षी मासिक एसआयपी सुरू केली असली तरी, तो निवृत्तीच्या वेळेपर्यंत ५० कोटी रुपये जमा करू शकतो, त्यात आर्थिक शिस्तबद्धता हवी.

तुम्ही असे बनाल ५० कोटींचे मालक

म्युच्युअल फंड रिटर्न कॅल्क्युलेटरनुसार, ३० वर्षांत ५० कोटी रुपयांचा निधी तयार करण्यासाठी एखाद्याला संपूर्ण कार्यकाळात वार्षिक आधारावर १५% वार्षिक स्टेप-अप वापरावे लागेल. म्हणजेच, दरवर्षी एसआयपी रक्कम १५% वाढवावी लागेल. १५ टक्के परतावा गृहीत धरल्यास एका गुंतवणूकदाराला मासिक एसआयपी सुरू करण्यासाठी दरमहा २१ हजार रुपये लागतील. म्युच्युअल फंड गुंतवणूकदार ३० वर्षांत २१ हजार रुपयांच्या मासिक एसआयपीद्वारे ५० कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य करण्याची अपेक्षा करू शकतो. परंतु यासाठी, तुम्हाला तुमची एसआयपी रक्कम वार्षिक आधारावर १५% वाढवावी लागेल.

विभाग