Mutual funds : म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी ३० एप्रिलपूर्वी करावे हे काम, अन्यथा पडाल अडचणीत
Mutual funds : म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी ३० एप्रिलपूर्वी केवायसीचे पुनर्प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. यासंदर्भात सेबीने परिपत्रकही जारी केले आहे. असे न केल्यास व्यवहारात अडचणी येऊ शकतात.
Mutual funds : तुम्ही म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ३० एप्रिल २०२३ पर्यंत म्युच्युअल फंडासंदर्भातील केवायसीचे पूर्नप्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे. सेबीने या अंतिम मुदतीत अनेकदा वाढ केली आहे. सेबीने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. ज्या ग्राहकांनी आधारकार्डाला केवायसीअंतर्गत प्रमुख दस्तावेज म्हणून सादर केले आहे त्यांनी १ नोव्हेंबर २०२२ नंतर १८० दिवसांच्या अंतर्गत रिव्हॅलिडेट करणे अनिवार्य केले आहे. याआधी सेवीने केवायसीला रिव्हॅलिडेट करण्याची अंतिम मुदत १ जूलै २०२२ निश्चित करण्यात आली होती.
ट्रेंडिंग न्यूज
व्यवहारात येऊ शकतो अडथळा
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सेबीने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले होते की, ज्या ग्राहकांच्या नोंदी केआरएमध्ये नाहीत त्यांचे केवायसी प्रमाणित केल्यानंतरच त्यांचा बाजारात व्यवहार करण्याची परवानगी दिली जाईल.
पूनर्प्रमाणित केल्यास फायदा होईल
एकदा तुमचे पुनर्प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर केआरएकडून एक कोड दिला जाईल, ज्याच्या मदतीने ग्राहक केवायसी प्रक्रियेची पुनरावृत्ती न करता सहजपणे कुठेही खाते उघडू शकतात.
म्युच्युअल फंडात गुंतवणूक
म्युच्युअल फंड हा शेअर बाजारात गुंतवणुकीचा एक अतिशय लोकप्रिय मार्ग आहे. यामध्ये तुम्ही एसआयपीद्वारे आणखी एक मोफत गुंतवणूक करु शकतात. गेल्या काही वर्षांत म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांमध्ये अधिक लोकप्रिय झाले आहे.
संबंधित बातम्या
विभाग