मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Mutual Funds : म्युच्युअल फंड धारकांसाठी अपडेट्स,कमाईवरील कराचे हे नियम बदलणार

Mutual Funds : म्युच्युअल फंड धारकांसाठी अपडेट्स,कमाईवरील कराचे हे नियम बदलणार

Mar 24, 2023 04:28 PM IST

Mutual Funds; सरकार डेट म्युच्युअल फंडातून लाॅग टर्म कॅपिटल गेन टॅक्स रद्द करण्याच्या विचारात आहेत. हा बदल सरकारच्या फायनान्स बिलात प्रस्तावित आहे आणि संसदेत त्यावर मंजूरी मिळण्याची प्रतिक्षा आहे

mutual funds HT
mutual funds HT

Mutual Funds; सरकार डेट म्युच्युअल फंडातून लाॅग टर्म कॅपिटल गेन टॅक्स रद्द करण्याच्या विचारात आहेत. हा बदल सरकारच्या फायनान्स बिलात प्रस्तावित आहे आणि संसदेत त्यावर मंजूरी मिळण्याची प्रतिक्षा आहे

Mutual Funds; म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. वास्तविक सरकार डेट म्युच्युअल फंडातून लाॅग टर्म कॅपिटल गेन टॅक्स (एलटीसीजी) रद्द करण्याच्या विचारात आहेत.हा बदल सरकारच्या फायनान्स बिलातून प्रस्तावित आहे. त्यानंतर संसदेत मंजूरी दिली जाणार आहे.

असे आहेत नियम

ट्रेंडिंग न्यूज

या बदलांनंतर डेट म्युच्युअल फंड कमाईच्या कराच्या चौकटीत येणार आहे. सध्याच्या काळात डेट म्युच्युअल फंडातून होणाऱ्या कमाईला ३ वर्षांतर एलटीसीजी कराच्या चौकटीत ठेवण्यात आले. इंडेक्सेशन बेनिफिट्ससह २० टक्के दरापासून अथवा इंडेक्सेक्शन विना १० टक्के दराने करकपात केली जाते. ३ वर्षापेक्षा कमी होल्डिंग कालावधीतील गुंतवणूकदारांवर त्यांच्या कर मर्यादेप्रमाणे कर लादला जातो.

आता कसा आहे प्रस्ताव

फायनान्स बिलामध्ये प्रस्ताव आहे की, इक्विटी शेअर्समध्ये ३५ टक्क्यांपेक्षा अधिक गुंतवणूक न करणाऱ्या डेट फंडांवर आयकर स्लॅब स्तरावर कर लावण्यात येणार आहे. त्याला शाॅर्ट टर्म कॅपिटल गेन मानले जाईल. बँक फिक्स्ड डिपाॅझीट्सवरही अशाच प्रकारे कर लावला जातो. सरकारच्या नव्या प्रस्तावात सोने, आंतरराष्ट्रीय इक्विटी आणि देशांतर्गत इक्विटी फंड्स आँफ फंड्सवरही कर लागू असतो. या प्रस्तावाला संसदेत मंजूरी मिळाल्यास १ एप्रिल २०२३ पासून नवा नियम त्वरित लागू केला जाईल. आज आठवड्याच्या शेवटच्या सत्रात शुक्रवारी म्युच्युअल फंड कंपन्याच्या शेअर्समध्ये घसरण पहायला मिळाली होती.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग