Mumbai tops asia in billionaires list : मायानगरी मुंबईला सात वर्षांनंतर पुन्हा अब्जाधीशांचे शहर म्हणून दर्जा प्राप्त झाला आहे. अब्जाधीशांचे शहर म्हणून मुंबई आता आशिया खंडात पहिल्या क्रमांकावर आले आहे. तर न्यूयॉर्कनंतर अब्जाधीशांच्या बाबतीत मुंबई जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूयॉर्क हे ११९ अब्जाधीश असलेले शहर आहे. ९७ अब्जाधीशांसह लंडन दुसऱ्या स्थानावर आहे.
ॲरॉनच्या यादीनुसार, मुंबईने २६ नवे अब्जाधीश जोडून चीनची राजकीय आणि सांस्कृतिक राजधानी बीजिंगला मागे टाकले आहे. बीजिंगमध्ये एका वर्षात १८ अब्जाधीश असलेले नागरिक आता करोडपती झाले आहेत. म्हणजेच हे नागरिक अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर पडले आहेत. सध्या बीजिंगमध्ये फक्त ९१ अब्जाधीश उरले आहेत आणि जगात चौथ्या आणि आशियामध्ये दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक अब्जाधीश असलेले शहर आहे. पाचव्या स्थानावर ८७ अब्जाधीशांसह चीनचे शांघाय शहर आहे.
मुंबईतील सर्व अब्जाधीशांची एकूण संपत्ती ही ४४५ अब्ज डॉलर आहे. ही संपत्ती गेल्या वर्षीच्या तुलनेत ४७ टक्क्याने वाढले आहे. तर बीजिंगच्या अब्जाधीशांची एकूण संपत्ती ही २६५ अब्ज डॉलर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण २८ टक्क्यांनी कमी झाले आहे. मुंबईत ऊर्जा आणि फार्मास्युटिकल्ससारख्या क्षेत्रातून पैशांचा पाऊस पडत आहे. मुकेश अंबानींसारखे अब्जाधीश यामध्ये प्रचंड नफा कमावत आहेत.
तर रिअल इस्टेटमध्ये सर्वात आघाडीचे नाव असलेले मंगल प्रभात लोढा आणि त्यांच्या कुटुंबियांची संपत्तीची टक्केवारी ही ११६ टक्के आहे. नुसार मुंबईतील सर्वात जास्त संपत्ती मिळवणारे होते. जर आपण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीबद्दल बोललो तर मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत चांगली वाढ झाली आहे आणि ते १० व्या स्थानावर आपले स्थान कायम राखण्यात यशस्वी ठरले आहेत. याचे श्रेय प्रामुख्याने रिलायन्स इंडस्ट्रीजला जाते.
तर गौतम अदानी यांच्या संपत्तीत देखील लक्षणीय वाढ झाली असून जागतिक स्तरावर अब्जाधीशांच्या यादीत ते १५ व्या स्थानावर गेले आहे. HCL चे शिव नाडर आणि त्यांच्या कुटुंबाची संपत्तीत आणि जागतिक क्रमवारीत त्यांचे स्थान देखील उंचावले आहे. श्रीमंतच्या यादीत ते ३४ व्या स्थानावर पोहोचले आहेत.
सीरम इन्स्टिट्यूटचे सायरस एस पूनावाला यांच्या एकूण संपत्तीत किरकोळ घट झाली आहे.त्यांची संपत्ति ही ८२ अब्ज डॉलर्स झाली आहे. त्यांचे श्रीमंताच्या यादीतील स्थान घसरून ५५ व्या स्थानावर आले आहेत. दिलीप सांघवी हे ६१ तर सन फार्मास्युटिकल्सचे कुमार मंगलम बिर्ला हे जागतिक अब्जाधीशांच्या यादीत १०० व्या स्थानावर आहेत. DMart च्या यशामुळे राधाकिशन दमानी यांच्या संपत्तीत माफक पण स्थिर वाढ झाल्याने ते देखील १०० व्या स्थानावर पोहचले आहे. या अब्जाधीशांमुळेच मुंबईने आज अब्जाधीशांच्या शहराच्या बाबतीत चीनला मागे टाकले आहे.