मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Multibagger stocks : सेन्सेक्स निफ्टीच्या जबरदस्त घसरणीनंतर हे स्टाॅक्स ठरतील 'मल्टिबॅगर' यादी पहा

Multibagger stocks : सेन्सेक्स निफ्टीच्या जबरदस्त घसरणीनंतर हे स्टाॅक्स ठरतील 'मल्टिबॅगर' यादी पहा

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 25, 2023 06:13 PM IST

Multibagger stocks : आज सेन्सेक्स निफ्टीमध्ये जबरदस्त घसरण झाली. तर दुसरीकडे अनेक कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकालही येत आहेत. निकाल तसेच कॉर्पोरेट अपडेट्समुळे अनेक कंपन्यांचे शेअर्स गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरत आहेत. ब्रोकरेज हाऊसेसने या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

Multibagger stocks HT
Multibagger stocks HT

Multibagger stocks : आज सेन्सेक्स निफ्टीमध्ये जबरदस्त घसरण झाली. तर दुसरीकडे अनेक कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकालही येत आहेत. निकाल तसेच कॉर्पोरेट अपडेट्समुळे अनेक कंपन्यांचे शेअर्स गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरत आहेत. ब्रोकरेज हाऊसेस पुढील शेअर्सबदल आश्वासक असून येत्या वर्षभरात ४५ टक्क्यांपेक्षा अधिक परतावा त्यावर मिळू शकतो.

कॅनरा बँक

कॅनरा बँकेच्या शेअर्सवर ब्रोकरेज हाऊसेसी बाय नाऊचा कौल दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य किंमत ४१० रुपये आहे. २४ जानेवारीला शेअरची किंमत ३१९ रुपये होती. लक्ष्य किंमतीनुसार गुंतवणूकदारांना प्रति शेअर ९१ रुपये म्हणजे अंदाजे २८ टक्के परतावा मिळू शकतो.

पाँलीकॅब इंडिया

ब्रोकरेज फर्मने पॉलीकॅब इंडियाच्या शेअर्सवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअर्सची प्रति शेअर लक्ष्य किंमत ३३८० रुपये आहे. कालच्या सत्रात शेअरची किंमत २,८१२ रुपये होती. लक्ष्य किंमतीनुसार गुंतवणूकदारांना प्रति शेअर ५६८ रुपये म्हणजे तब्बल २० टक्के अधिक परतावा मिळू शकतो.

पीव्हीआर

ब्रोकरेज फर्मने पीव्हीआर शेअर्सवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. प्रति शेअर लक्ष्य किंमत २,११० आहे. 24 जानेवारीला शेअरची किंमत १,६८० रुपये होती. लक्ष्य किंमतीनुसार गुंतवणूकदारांना प्रति शेअर 25 टक्के परतावा मिळू शकतो.

रुट मोबाईल

ब्रोकरेज फर्म्सनी रूट मोबाइलचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. प्रति शेअर लक्ष्य किंमत १, ५९० आहे. काल शेअरची किंमत १,२२६ रुपये होती. लक्ष्य किंमतीनुसार गुंतवणूकदारांना प्रति शेअर ३६४ रुपये म्हणजे २७ टक्के परतावा मिळू शकतो.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग