पाच वर्षांत ५८० टक्के नफा देणाऱ्या पटेल इंजिनीअरिंगच्या शेअरमध्ये पुन्हा तेजी, तिमाही निकालाचा परिणाम
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  पाच वर्षांत ५८० टक्के नफा देणाऱ्या पटेल इंजिनीअरिंगच्या शेअरमध्ये पुन्हा तेजी, तिमाही निकालाचा परिणाम

पाच वर्षांत ५८० टक्के नफा देणाऱ्या पटेल इंजिनीअरिंगच्या शेअरमध्ये पुन्हा तेजी, तिमाही निकालाचा परिणाम

HT Marathi Desk HT Marathi
Published Feb 13, 2025 05:21 PM IST

पटेल इंजिनीअरिंगच्या शेअर्समध्ये 6% वाढ झाली असून, 48.50 रुपयांवर पोहोचले आहेत. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल 13.62% वाढून 1,205 कोटी रुपये झाला, आणि नफा 80.4 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

सेन्सेक्स
सेन्सेक्स ((Photo: Reuters))

शानदार तिमाही निकालानंतर इन्फ्रा आणि कन्स्ट्रक्शन कंपनी - पटेल इंजिनीअरिंगच्या शेअर्समध्ये गुरुवारी वादळी वाढ झाली. आठवड्याच्या चौथ्या दिवशी हा शेअर 6 टक्क्यांनी वधारून 48.50 रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षी फेब्रुवारीमहिन्यात हा शेअर ७४.९९ रुपयांवर गेला होता. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर होता. या अर्थाने हा शेअर रिकव्हरी मोडमध्ये आहे. मार्च २०२० मध्ये हा शेअर ७.१० रुपयांवर होता. या अर्थाने हा शेअर सध्या ५८० टक्क्यांहून अधिक वर ट्रेड करत आहे.

पटेल इंजिनीअरिंगचा डिसेंबर तिमाहीतील कामकाजातून मिळणारा महसूल १३.६२ टक्क्यांनी वाढून १,२०५ कोटी रुपये झाला आहे. कंपनीचा ऑपरेटिंग एबिटा गेल्या वर्षीच्या १४२ कोटी रुपयांच्या तुलनेत २९.५० टक्क्यांनी वाढून १८४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ऑपरेटिंग एबिटा मार्जिन 13.39% वरून 15.26% पर्यंत वाढले आहे. कंपनीचा नफा गेल्या वर्षीच्या ७०.२ कोटी रुपयांवरून ८०.४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

पटेल इंजिनीअरिंग कंपनीवरील कर्ज आणि प्रकल्पांवर ३१ डिसेंबर २०२४ रोजी एकूण कर्ज १४२२ कोटी रुपये होते, जे ३१ मार्च २०२४ रोजी १८८५ कोटी रुपये होते. डिसेंबर तिमाहीत कंपनीचे ऑर्डर बुक १६,३९६ कोटी रुपये होते, त्यापैकी ६३ टक्के प्रकल्प जलविद्युत विभागाशी संबंधित होते. कंपनीकडे सध्या १०४२८ कोटी रुपयांचे १५ जलविद्युत प्रकल्प आहेत, ज्यात सुबनसिरी एचईपी (२,००० मेगावॉट), दिबांग बहुउद्देशीय प्रकल्प (२,८८० मेगावॉट), किरू एचईपी (६२४ मेगावॉट), अरुण-३ एचई प्रकल्प (९०० मेगावॉट), शोंगटोंग एचईपी (४५० मेगावॉट) आणि क्वार एचईपी (५४० मेगावॉट) यांचा समावेश आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner