Stock Market News Today : शेअर बाजारात जोखीम असते हे खरं आहे, पण ती अभ्यासाशिवाय आणि तारतम्य न बाळगता गुंतवणूक करणाऱ्यांसाठी. योग्य अभ्यास करून योग्य शेअरची निवड केल्यास हीच जोखीम आपल्याला बक्कळ फायदा मिळवून देऊ शकते. मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजचा शेअर हे त्याचं उत्तम उदाहरण म्हणावं लागेल.
गेल्या वर्षभरापासून शेअर बाजारात चांगली कामगिरी करणाऱ्या मल्टी कमॉडिटी एक्स्चेंज या कंपनीच्या शेअर्सनं आज प्रथमच ७००० रुपयांचा टप्पा ओलांडला. शुक्रवारी एनएसईवर कंपनीचा शेअर ८.५ टक्क्यांनी वधारून ७०४८.६० रुपयांवर पोहोचला. बाजार बंद होताना एनएसईवर कंपनीचा शेअर ६.४१ टक्क्यांनी वधारून ६९०४ रुपयांवर बंद झाला.
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा १५३.६० कोटी रुपये होता. गेल्या वर्षी सप्टेंबर तिमाहीत कंपनीला १९.१ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा एकूण महसूल २८५.६० कोटी रुपये आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल १६४.१० कोटी रुपये होता. कंपनीच्या महसुलात आणि नफ्यात यंदा वाढ झाली आहे.
कंपनी नवीन उत्पादनं आणण्याचा विचार करत आहे. त्याचबरोबर वाढीच्या पुढील टप्प्यावरही कंपनीचं लक्ष आहे. ब्रोकरेज हाऊस एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते कंपनी तंत्रज्ञानाच्या संक्रमणाकडं विशेष लक्ष देत आहे. कंपनीनं आज ब्रोकरेज हाऊसचं ७००० रुपयांची लक्ष्य किंमत ओलांडली आहे.
या कंपनीसाठी गेलं वर्ष संस्मरणीय ठरलं असून, गेल्या ६ महिन्यांत मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजच्या शेअर्सच्या किंमतीत २८ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर, पोझिशनल गुंतवणूकदारांनी गेल्या ६ महिन्यांत ९८ टक्के नफा मिळवला आहे. एका वर्षात या शेअरनं ११८ टक्के परतावा दिला आहे. तर गेल्या २ वर्षात कंपनीच्या शेअरच्या किंमतीत ३४३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर २९१७ रुपये आहे.
संबंधित बातम्या