मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Multibagger stock : आयशर मोटर्सचा शेअर सुस्साट; २० रुपयांवरून ३३०० रुपयांवर

Multibagger stock : आयशर मोटर्सचा शेअर सुस्साट; २० रुपयांवरून ३३०० रुपयांवर

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Dec 05, 2022 06:47 PM IST

Multibagger stock Eicher Motors: शेअर बाजारात झटपट रिटर्न्स देणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये भारतीय आॅटोमोटिव्ह कंपनी आयशर मोटर्सच्या शेअर्सचा समावेश आहे.

buy Stock HT
buy Stock HT

Eicher Motors: शेअर बाजारात झटपट रिटर्न्स देणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये भारतीय आॅटोमोटिव्ह कंपनी आयशर मोटर्सच्या शेअर्सचा समावेश आहे. या कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना दीर्घकालीन परतावा जबरदस्त दिला आहे. गेल्या १४ वर्षांत एक लाखांपेक्षा कमी केलेली गुंतवणूक आज एक कोटींच्या घरात पोहोचली आहे.

शेअर बाजारात कोणताही एक शेअर कधी लाखांचे कोटी करतो तर कोट्यावधींचे नुकसानही करतो. आयशर मोटर्स कंपनीचा शेअर्सही त्यापैकी एकच. या शेअर्समध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदांना आज कोट्याधीश केले आहे. ज्या गुंतवणूकदारांनी १४ वर्षापूर्वी ६० हजार रुपये गुंतवणूक केली होती, ते आज कोट्याधीश आहेत. एवढ्या कमी वेळात कंपनीने १६,१४५ टक्के परतावा दिला आहे.

२००८ मध्ये किंमत २०.५१ रुपये प्रति शेअर्स होती

आयशर मोटर्स ही राॅयल एनफिल्डची मूळ कंपनी आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी ती फायद्याची ठरली आहे. ५ डिसेंबर २००८ मध्ये कंपनीचे शेअर्स केवळ २०.५१ रुपये प्रति शेअर्स होते. मात्र १४ वर्षांत त्याची किंमत अंदाजे ३३३१.८० रुपयांवर पोहोचली आहे.

गेल्या वर्षी १ नोव्हेंबरला या कंपनीच्या शेअर्सचा भाव रेकाॅर्ड हायवर पोहोचला होता.मात्र त्यानंतर त्यात १४ टक्के घसरण झाली. मात्र २०२२ मध्ये त्यात वाढ होत गेली. आणि १ नोव्हेंबरपर्यंत तो आँल टाईम हाय ३,८८६ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. बाजारातील तज्ज्ञांनी या आँटोमोटिव्ह कंपनीच्या शेअर्सवरील विश्वास कायम ठेवला आहे. ब्रोकरेज फर्म्सनी शेअर्स खरेदीचा सल्ला दिला आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग