Multibagger Stock : मल्टीबॅगर स्टॉक धानी सर्व्हिसेसच्या शेअरच्या किमती आज १५ टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. शुक्रवारी कंपनीच्या शेअर्सनी ९७.८० रुपयांची पातळी गाठली होती. बाजार बंद झाला तेव्हा कंपनीचे शेअर्स बीएसईवर १० टक्क्यांहून अधिक वाढीसह ९३.१८ रुपयांच्या पातळीवर होते. केवळ ३ ट्रेडिंग दिवसांत कंपनीच्या शेअर्सची किंमत २४ टक्क्यांहून अधिक वाढली आहे.
गेल्या २ महिन्यांत कंपनीच्या शेअरच्या किमतीत १०७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २ महिन्यांपूर्वी धानी सर्व्हिसेसच्या शेअरची किंमत ४७.१७ रुपये होती. कंपनीची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ३३.३० रुपये आहे.
जुलै ते सप्टेंबर या कालावधीत कंपनीचा नफा ४.१९ कोटी रुपये आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ तोटा १०४.९४ कोटी रुपये होता. पहिल्या तिमाहीत कंपनीचा तोटा ८३.३४ कोटी रुपये होता. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल १०२.६३ कोटी रुपये होता. तर, गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल ९८.५७ कोटी रुपये होता.
कंपनीने २०२० मध्ये गुंतवणूकदारांना शेवटचा लाभांश दिला होता. त्यानंतर कंपनीकडून प्रति शेअर २.२५ रुपये लाभांश देण्यात आला.
गेल्या २ वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत १०१ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या ५ वर्षांपासून धनी सर्व्हिसेसचे शेअर्स धारण करणाऱ्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत ४० टक्के तोटा सहन करावा लागला आहे. तर या काळात सेन्सेक्स १०२ टक्क्यांनी वाढला आहे.
संबंधित बातम्या