एका वर्षात ७१७ टक्के नफा मिळवून देणारा मल्टिबॅगर शेअर ५ भागांत स्प्लिट होणार, आज खरेदीची शेवटची संधी
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  एका वर्षात ७१७ टक्के नफा मिळवून देणारा मल्टिबॅगर शेअर ५ भागांत स्प्लिट होणार, आज खरेदीची शेवटची संधी

एका वर्षात ७१७ टक्के नफा मिळवून देणारा मल्टिबॅगर शेअर ५ भागांत स्प्लिट होणार, आज खरेदीची शेवटची संधी

Aug 30, 2024 12:33 PM IST

Bondada Engineering Share Price : शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध झाल्यापासून ४४०० टक्के परतावा देणारा मल्टिबॅगर शेअर घेण्याची उत्तम संधी चालून आली आहे.

शेयर बाजार में कंपनी अगले हफ्ते एक्स-स्प्लिट के तौर पर ट्रेड करेगी।
शेयर बाजार में कंपनी अगले हफ्ते एक्स-स्प्लिट के तौर पर ट्रेड करेगी।

share split news : बोंडाडा इंजिनीअरिंगच्या शेअर पुढील आठवड्यात तब्बल पाच भागांत विभागला होणार आहे. या विभागणीचा फायदा तुम्हाला घ्यायचा असेल तर आज तुमच्यासाठी शेवटची संधी आहे.

कंपनीनं शेअर मार्केटला या शेअरच्या विभाजनाबद्दल माहिती दिली आहे. त्यानुसार १० रुपये अंकित मूल्य (Face Value) असलेला हा शेअर ५ भागांमध्ये विभागला जाणार आहे. या शेअर स्प्लिटनंतर कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू प्रति शेअर २ रुपयांपर्यंत खाली येईल. कंपनीनं या शेअर विभाजनाची (Share Split) रेकॉर्ड डेट २ सप्टेंबर २०२४ सोमवार निश्चित केली आहे. याचाच अर्थ विभाजनाचा फायदा घेण्याची आज शेवटची संधी आहे. 

कंपनीच्या शेअरची वाटचाल

बोंडाडा इंजिनीअरिंगचा आयपीओ ऑगस्ट २०२३ मध्ये आला. कंपनीचा आयपीओ आला तेव्हा इश्यू प्राइस ७५ रुपये होती. तेव्हापासून कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत ४४०० टक्क्यांची वाढ झाली आहे. या वर्षी आतापर्यंत कंपनीच्या शेअरच्या किमतीत ७१७ टक्क्यांची वाढ झाली आहे. 

सहा महिन्यांत २७२ टक्के रिटर्न्स

ज्या गुंतवणूकदारांनी ६ महिने शेअर्स ठेवले आहेत, त्यांना आतापर्यंत २७२ टक्के परतावा मिळाला आहे. आज (३० ऑगस्ट २०२४) देखील कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. सकाळी १२.३० वाजता कंपनीचा शेअर सव्वा टक्क्यांनी वाढून ३४६० रुपयांवर पोहोचला आहे. याआधी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी कंपनीचे शेअर्स घसरणीसह उघडले होते.

काय करते ही कंपनी?

बोंडाडा इंजिनीअरिंग ही इन्फ्रास्ट्रक्चर सोल्युशन्स प्रोव्हायडर कंपनी आहे. ही कंपनी दूरसंचार, नुतनीकृत ऊर्जा आणि बांधकाम क्षेत्रात काम करते.

 

(डिस्क्लेमर : हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या सल्लागाराचा सल्ला घ्या.)

Whats_app_banner