Multibagger stock : याला म्हणतात शेअर मार्केटची ताकद! अवघ्या एका महिन्यात पैसे झाले दुप्पट
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Multibagger stock : याला म्हणतात शेअर मार्केटची ताकद! अवघ्या एका महिन्यात पैसे झाले दुप्पट

Multibagger stock : याला म्हणतात शेअर मार्केटची ताकद! अवघ्या एका महिन्यात पैसे झाले दुप्पट

May 31, 2024 05:29 PM IST

RattanIndia Power Ltd share price : रतन इंडिया लिमिटेड या शेअरनं गुंतवणूकदारांचे पैसे अवघ्या एका महिन्यात दुप्पट केले आहेत.

Multibagger stock : याला म्हणतात शेअर मार्केटची ताकद! अवघ्या एका महिन्यात पैसे झाले दुप्पट
Multibagger stock : याला म्हणतात शेअर मार्केटची ताकद! अवघ्या एका महिन्यात पैसे झाले दुप्पट

RattanIndia Power Ltd share price : शेअर बाजार हा सध्या गुंतवणुकीचा सर्वात लोकप्रिय पर्याय बनत चालला आहे. मोबाइल हाती आल्यामुळं आणि ऑनलाइन ब्रोकिंग अ‍ॅपमुळं शेअरची खरेदी विक्री देखील सोपी झाली आहे. हे सगळं बरोबर असलं तरी शेअर बाजारातून नफा कमावणं हे सगळ्यांनाच जमत नाही आणि ते सोप्पंही नाही. त्यासाठी अभ्यासाची गरज असते. शेअर बाजाराचं ज्ञान हे कष्टसाध्य आहे. ते मिळालं तर चांगला नफा मिळू शकतो. योग्य अभ्यास करून आणि पुरेसा वेळ देऊन नफा कमावणारी अशी अनेक उदाहरणं आहेत.

रतन इंडिया कंपनीच्या गुंतवणूकदारांची त्यात भर पडली आहे. रतन इंडियाच्या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या महिनाभरात दामदुप्पट नफा मिळवून दिला आहे. महिन्याभरापूर्वी या शेअरची किंमत फक्त ९.२० रुपये होती, ती आज १८.९० रुपये झाली आहे. या कालावधीत रतन इंडियाच्या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना १०५ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे आणि त्यांची १ लाख रुपयांची गुंतवणूक २.०५ लाख रुपयांमध्ये रूपांतरित केली आहे. इतकंच नाही तर, गेल्या पाच दिवसांत ४ वेळा या स्टॉकला अपर सर्किट लागलं आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांना या शेअरनं सुमारे २० टक्के परतावा दिला आहे.

एका वर्षात १ लाखाचे झाले ५.६५ लाख

रतन इंडिया लिमिटेड या कंपनीच्या शेअरनं एका वर्षात ४६४ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. त्यामुळं हा शेअर मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत सहभागी झाला आहे. वर्षभरापूर्वी ज्या कोणी रतन इंडियाचे शेअर्स ३.३५ रुपयांना विकत घेऊन १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, त्याच्या गुंतवणुकीचं मूल्य आता ५.६५ लाख रुपये झालं असेल. या शेअरनं आज ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. हा शेअर १९.१५ रुपयांवर गेला होता. तर, शेअरची ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत ३.१५ रुपये आहे.

विदेशी गुंतवणूकदार 'या' शेअरवर फिदा

मार्च तिमाहीपर्यंत या शेअरमध्ये प्रवर्तकांचा हिस्सा ४४.०६ टक्के होता. त्यापैकी ८८.६५ टक्के शेअर्स गहाण ठेवलेले आहेत. परकीय गुंतवणूकदार या पेनी स्टॉकबद्दल इतके आकर्षित झाले आहेत की त्यांनी डिसेंबर तिमाहीत त्यांचे शेअर होल्डिंग ०.७६ टक्क्यांवरून २.०४ टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आहेत. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनीही त्यांचे स्टेक ०.०९ टक्क्यांवरून ०.११ टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आहेत. यामध्ये म्युच्युअल फंडांचा मोठा वाटा आहे. इतरांकडे ५३.७९ टक्के हिस्सा आहे.

Whats_app_banner