Penny Stock : तीन रुपयांचा 'हा' शेअर सातत्यानं वधारतोय! विदेशी संस्थांचीही आहे मोठी गुंतवणूक, तुमच्याकडं आहे का?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Penny Stock : तीन रुपयांचा 'हा' शेअर सातत्यानं वधारतोय! विदेशी संस्थांचीही आहे मोठी गुंतवणूक, तुमच्याकडं आहे का?

Penny Stock : तीन रुपयांचा 'हा' शेअर सातत्यानं वधारतोय! विदेशी संस्थांचीही आहे मोठी गुंतवणूक, तुमच्याकडं आहे का?

HT Marathi Desk HT Marathi
Dec 10, 2024 06:19 PM IST

Integra Essentia share Price : इंटिग्रा इसेन्शिया हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक सातत्यानं वधारत आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी हिस्सा वाढवल्यानं या शेअरकडं लक्ष वेधलं गेलं आहे.

Penny Stock : तीन रुपयांचा 'हा' शेअर सातत्यानं वधारतोय! विदेशी संस्थांचीही आहे मोठी गुंतवणूक
Penny Stock : तीन रुपयांचा 'हा' शेअर सातत्यानं वधारतोय! विदेशी संस्थांचीही आहे मोठी गुंतवणूक

Multibagger Penny Stock : इंटिग्रा एसेन्शिया या चिमुकल्या शेअरला गेल्या दोन सत्रांपासून सलग पाच टक्क्यांचं अप्पर सर्किट लागत आहे. मंगळवारी, १० डिसेंबर रोजी कंपनीच्या शेअरनं ३.३६ रुपये प्रति शेअरचा उच्चांक गाठला. हा या शेअरचा इंट्राडे उच्चांक आहे. एनएसईवर आज सुमारे १५.८ लाख समभागांचे व्यवहार झाले.

गेल्या पाच वर्षांत इंटिग्रे एसेन्शियाचा शेअर १,०६० टक्क्यांनी वाढला आहे. यामुळं गुंतवणूकदारांचे पैसे ११ पटीनं वाढले आहेत. या कालावधीत १०,००० रुपयांची गुंतवणूक वाढून १.०६ लाख रुपये झाली आहे. कंपनीचं मार्केट कॅप ३५८.७४ कोटी रुपये आहे. आर्थिक वर्ष २०२४ अखेर कंपनीवर एकूण कर्ज ७.३८ कोटी रुपये होतं.

काय म्हणाली कंपनी?

६ ऑगस्ट २००७ रोजी फाइव्ह स्टार मर्कंटाइल प्रायव्हेट लिमिटेड या नावानं स्थापन झालेली इंटिग्रा एसेन्शिया ३ जानेवारी २०१२ रोजी पब्लिक लिमिटेड युनिट बनली. जून २०१२ मध्ये कंपनीचं एकत्रीकरण केलं गेलं आणि कंपनीचं नाव बदलून इंटिग्रा गारमेंट्स अँड टेक्सटाइल्स लिमिटेड असं करण्यात आलं. २०२२ मध्ये उद्योजक विशेष गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली कंपनीनं एफएमसीजी आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये विस्तार केला. १६ फेब्रुवारी २०२२ रोजी पुन्हा नाव बदलून इंटिग्रा एसेन्शिया लिमिटेड केलं गेलं. आता ही कंपनी अन्न, कपडे, पायाभूत सुविधा आणि उर्जा यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा व्यवहार करते.

सप्टेंबर तिमाहीचे निकाल

३० सप्टेंबर २०२४ पर्यंतच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, प्रवर्तकांनी कंपनीतील हिस्सा मागील तिमाहीतील २०.८१ टक्क्यांवरून १५.९८ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनीही (DII) कंपनीतील आपला हिस्सा १.०७ टक्क्यांवरून ०.३९ टक्क्यांवर आणला आहे. मात्र, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) आपला हिस्सा ०.१२ टक्क्यांवरून ०.१३ टक्क्यांवर नेला आहे. २० सप्टेंबर २०२४ पर्यंत या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांची हिस्सेदारी ८३.५१ टक्के आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner