मोफत शेअर मिळण्याची शक्यता दिसताच मिडकॅप कंपनीचा स्टॉक उसळला! किती झाला भाव?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  मोफत शेअर मिळण्याची शक्यता दिसताच मिडकॅप कंपनीचा स्टॉक उसळला! किती झाला भाव?

मोफत शेअर मिळण्याची शक्यता दिसताच मिडकॅप कंपनीचा स्टॉक उसळला! किती झाला भाव?

Jan 01, 2025 03:30 PM IST

Transformers and Rectifiers India Share Price : ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडियाच्या शेअरला बुधवारी ५ टक्क्यांचं अप्पर सर्किट लागलं. बोनस शेअर देण्याचा विचार कंपनी करत असल्याच्या पार्श्वभूमीवर शेअरमध्ये ही वाढ झाली आहे.

मोफत शेअर मिळण्याची शक्यता दिसताच मिडकॅप कंपनीचा स्टॉक उसळला! ५ टक्क्यांच अप्पर सर्किट लागलं!
मोफत शेअर मिळण्याची शक्यता दिसताच मिडकॅप कंपनीचा स्टॉक उसळला! ५ टक्क्यांच अप्पर सर्किट लागलं!

Share Market News : मल्टीबॅगर मिडकॅप स्टॉक ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडियाच्या शेअरला आज इंट्राडे ट्रेडदरम्यान ५ टक्क्यांचं अप्पर सर्किट लागलं. कंपनीच्या संचालक मंडळ ८ जानेवारी रोजी बोनस शेअर इश्यू करण्याचे संकेत दिले आहेत. त्याचा परिणाम कंपनीच्या शेअरच्या किंमतीवर झाला आहे.

ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडियाच्या शेअरचा भाव बुधवारी बीएसईवर ११९५.९५ रुपयांवर उघडला. त्यात थेट ५ टक्क्यांची वाढ झाली. ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडियाच्या शेअरची ही किंमत ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ आहे. हा शेअर गेल्या दोन वर्षांत ३० पटीनं वाढला असून गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

एकत्रित निकालाबरोबर बोनस इश्यूचा विचार

ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेडच्या संचालक मंडळाची बैठक बुधवारी, ८ जानेवारी २०२५ रोजी होणार असल्याची माहिती मंगळवारी शेअर बाजाराला देण्यात आली. कंपनीचं संचालक मंडळ ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांच्या कंपनीच्या अनऑडिटेड स्टँडअलोन आणि एकत्रित वित्तीय निकालांचा विचार करेल आणि त्यास मंजुरी देईल. कंपनीचं संचालक मंडळ कंपनीच्या भागधारकांना बोनस इक्विटी शेअर्स जारी करण्याच्या प्रस्तावावरही विचार करेल. 

पोस्कोशी महत्त्वाचा करार

डिसेंबरमध्ये ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स (इंडिया) लिमिटेडनं पोस्को पोगेनॅम्प इलेक्ट्रिकल स्टील प्रायव्हेट लिमिटेडमधील धोरणात्मक गुंतवणुकीतील नियंत्रक हिस्सा हस्तांतरित करण्यासाठी शेअर खरेदी आणि भागधारक करारावर स्वाक्षरी केली होती.

कोल्डरोल्ड ग्रेन-ओरिएंटेड (सीआरजीओ) स्टील म्हणून ओळखलं जाणारं इलेक्ट्रिकल स्टील हे प्रामुख्यानं ट्रान्सफॉर्मरच्या कोरमध्ये वापरलं जाणारं एक आवश्यक साहित्य आहे. ट्रान्सफॉर्मरमधील चुंबकीय प्रवाह प्रक्रियेदरम्यान ऊर्जेचं नुकसान कमी करणारी विशिष्ट रचना तयार करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया पॉस्को पोगेनॅम्प इलेक्ट्रिकल स्टीलमध्ये गुंतवणूक करीत आहे.

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner