multibagger stock : संयमाचं फळ किती गोड असू शकतं पाहा! ‘या’ शेअरनं १ लाखाचे बनवले ३३ लाख-multibagger dixon technologies share turned 1 lakh rupee investment into 33 lakh rupee ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  multibagger stock : संयमाचं फळ किती गोड असू शकतं पाहा! ‘या’ शेअरनं १ लाखाचे बनवले ३३ लाख

multibagger stock : संयमाचं फळ किती गोड असू शकतं पाहा! ‘या’ शेअरनं १ लाखाचे बनवले ३३ लाख

Sep 05, 2024 11:44 AM IST

Dixon Technologies Share Price : डिक्सन टेक्नॉलॉजीजच्या शेअरमध्ये मागील सुमारे पाच वर्षांच्या कालावधीत ३१०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करून संयम ठेवणाऱ्यांना तुफान फायदा झाला आहे.

multibagger stock : संयमाचं फळ किती गोड असू शकतं पाहा! ‘या’ शेअरनं १ लाखाचे बनवले ३३ लाख
multibagger stock : संयमाचं फळ किती गोड असू शकतं पाहा! ‘या’ शेअरनं १ लाखाचे बनवले ३३ लाख

Share market news updates : संयमाचं फळ किती गोड असू शकतं याचा प्रत्यय डिक्सन टेक्नॉलॉजीजच्या शेअरनं गुंतवणूकदारांना दिला आहे. या शेअरनं गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. मागील सुमारे ५ वर्षांच्या काळात या शेअरमध्ये ३१०० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

गेल्या पाच वर्षांत डिक्सन टेक्नॉलॉजीजचा शेअर ३८८ रुपयांवरून १२८०० रुपयांवर गेला आहे. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये १५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. डिक्सन टेक्नॉलॉजीजचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १३६३३.३५ रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ४७३८ रुपये आहे.

कसे झाले १ लाखाचे ३३ लाख?

डिक्सन टेक्नॉलॉजीजच्या समभागांनी ५ वर्षांत छप्परफाड परतावा दिला आहे. ९ ऑगस्ट २०१९ रोजी कंपनीचा शेअर ३८८.२० रुपयांवर होता. आज, ५ सप्टेंबर २०२४ रोजी हाच शेअर १२८३४.८५ रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीच्या शेअरनं या काळात गुंतवणूकदारांना ३१५० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. 

एखाद्या व्यक्तीनं ९ ऑगस्ट २०१९ रोजी डिक्सन टेक्नॉलॉजीजच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती तर सध्या १ लाख रुपयांना खरेदी केलेल्या शेअर्सची किंमत ३३.०६ लाख रुपये झाली असती.

गेल्या दोन वर्षांतही भरघोस परतावा

डिक्सन टेक्नॉलॉजीजच्या शेअर्समध्ये गेल्या २ वर्षांतही चांगली वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये २०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. २ सप्टेंबर २०२२ रोजी कंपनीचा शेअर ४१०६.६५ रुपयांवर होता, तोच आज १२८३४.८५ रुपयांवर पोहोचला आहे. डिक्सन टेक्नॉलॉजीजच्या शेअर्समध्ये गेल्या वर्षभरात १५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या काळात कंपनीचे शेअर्स ५१२७.७० रुपयांवरून १२८०० रुपयांपर्यंत वधारले आहेत. डिक्सन टेक्नॉलॉजीजच्या शेअरमध्ये या वर्षी आतापर्यंत ९५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला १ जानेवारी २०२४ रोजी कंपनीचा शेअर ६४४६.८० रुपयांवर होता. ५ सप्टेंबर २०२४ रोजी कंपनीचा शेअर १२८३४.८५ रुपयांवर पोहोचला आहे.

डिक्सन टेक्नॉलॉजी काय करते?

डिक्सन टेक्नॉलॉजीज ही कंपनी कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंगच्या व्यवसायात आहे. वेगवेगळ्या ब्रँडसाठी टेलिव्हिजन, स्मार्टफोन, वॉशिंग मशिन आणि इतर अनेक उत्पादने तयार करते. या कंपनीनं मार्च २०२१ मध्ये आपल्या शेअरचं विभाजन केलं होतं. कंपनीनं १० रुपये फेस व्हॅल्यू असलेले शेअर २ रुपये फेस व्हॅल्यूच्या ५ शेअरमध्ये विभागले होते.

 

(डिस्क्लेमर : हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या सल्लागाराचा सल्ला घ्या.)