Multibagger Defence Stock News : मागील तीन वर्षांत तब्बल १७०० टक्के परतावा देणारी डिफेन्स कंपनी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचे शेअर्स स्प्लिट होणार आहेत. एका शेअरचे दोन भागांत विभाजन होणार आहे. कंपनीनं या स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे.
माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या शेअरची सध्याची फेस व्हॅल्यू १० रुपये आहे. आता या शेअरची दोन भागांत विभागणी केली जाईल. या विभाजनानंतर कंपनीच्या शेअर्सची अंकित किंमत प्रति शेअर ५ रुपयांपर्यंत खाली येईल. कंपनीनं २७ डिसेंबर २०२४ ची रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. म्हणजेच, या दिवशी कंपनीच्या रेकॉर्डमध्ये शेअर असलेल्या गुंतवणूकदारांना स्प्लिटचा लाभ होईल.
कंपनीनं यंदाच्या वर्षात दोनदा गुंतवणूकदारांना डिविडंड दिला आहे. सुरुवातीला सप्टेंबर महिन्यात कंपनीनं पात्र गुंतवणूकदारांना १२.११ रुपयांचा लाभांश दिला होता. त्यानंतरच्या दुसऱ्याच महिन्यात ऑक्टोबरमध्ये गुंतवणूकदारांना प्रति शेअर २३.१९ रुपये लाभांश दिला होता.
गेल्या दोन महिन्यांत माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या शेअरमध्ये २० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर ६ महिन्यांपासून शेअर ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत ५३ टक्के नफा मिळाला आहे. २०२४ मध्ये माझगाव डॉकनं ११५ टक्के परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअरची किंमत २ वर्षात ४५७.९५ टक्के आणि ३ वर्षांत १७३६ टक्क्यांनी वाढली आहे. बीएसईमध्ये कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ५८५९.९५ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १७९७.१० रुपये आहे.
संबंधित बातम्या