Multibagger stock : संयमाचं फळ किती गोड असू शकतं? एका कंपनीच्या शेअरनं एक लाखाचे केले ७ कोटी-multibagger avanti feeds share rallied 65000 percent stock crossed 775 rupee from 1 rupee ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Multibagger stock : संयमाचं फळ किती गोड असू शकतं? एका कंपनीच्या शेअरनं एक लाखाचे केले ७ कोटी

Multibagger stock : संयमाचं फळ किती गोड असू शकतं? एका कंपनीच्या शेअरनं एक लाखाचे केले ७ कोटी

Aug 09, 2024 06:02 PM IST

Avanti Feeds Share Price : स्मॉलकॅप कंपनी अवंती फीड्सच्या शेअरने शुक्रवारी ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. गेल्या १५ वर्षात या कंपनीचे शेअर ६५ हजार टक्क्यांपेक्षा जास्त वाढले असून गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे.

Multibagger stock : संयमाचं फळ करोडोंमध्ये! १ रुपयांवरून ७७५ रुपयांवर गेला शेअर, नफ्याचा फक्त हिशेब करा!
Multibagger stock : संयमाचं फळ करोडोंमध्ये! १ रुपयांवरून ७७५ रुपयांवर गेला शेअर, नफ्याचा फक्त हिशेब करा!

Avanti Feeds Share Price : संयमाचं फळ किती गोड असू शकतं याची प्रचिती अवंती फीड्स या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरनं दिली आहे. अवघ्या एका रुपयावर असलेल्या या कंपनीच्या शेअरमध्ये १५ वर्षांत तब्बल ६५ हजार टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळं इतकी वर्षे गुंतवणूक करून शांत राहिलेले गुंतवणूकदार अक्षरश: करोडपती झाले आहेत.

अवंती फीड्सच्या शेअरमध्ये शुक्रवारी देखील जोरदार वाढ झाली. या कंपनीचा शेअर १७ टक्क्यांनी वधारून ७८७.४५ रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्सनी आज ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. गेल्या १५ वर्षांच्या कालावधीत कंपनीचे शेअर्स १.१४ रुपयांवरून ७७५ रुपयांवर गेले आहेत. अवंती फीड्सच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांतील नीचांकी स्तर ४३५.५५ रुपये आहे.

१४ ऑगस्ट २००९ रोजी अवंती फीड्सचा शेअर १.१४ रुपयांवर होता. हाच शेअर आज, ९ ऑगस्ट २०२४ रोजी ७८७.४५ रुपयांवर पोहोचला आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये ६५ हजार टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

१ लाखाचे झाले ६.९ कोटी

एखाद्या व्यक्तीनं १४ ऑगस्ट २००९ रोजी अवंती फीड्सच्या शेअर्समध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती, तर आज त्या एक लाख रुपयांच्या शेअर्सची किंमत ६.९ कोटी रुपये झाली असती. अवंती फीड्सनं दिलेले बोनस शेअर्स आणि लाभांश याचा या हिशेबात समावेश नाही. यावरून कंपनीनं दिलेल्या जबरदस्त परताव्याचा अंदाज बांधता येऊ शकतो.

कशी झाली शेअरची वाटचाल?

अवंती फीड्सच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात ९० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ९ ऑगस्ट २०२३ रोजी अवंती फीड्सचा शेअर ४०२.८० रुपयांवर होता. हा शेअर आज ७८७.४५ रुपयांवर पोहोचला आहे. तर या वर्षी आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ८० टक्के वाढ झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला १ जानेवारी २०२४ रोजी कंपनीचा शेअर ४३७.२० रुपयांवर होता, तो आता ७७५ रुपयांच्या पुढं गेला आहे.

बोनस शेअर्सचीही भेट

अवंती फीड्सनं आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सही भेट दिले आहेत. कंपनीनं जून २०१८ मध्ये १:२ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले. म्हणजेच कंपनीनं प्रत्येक २ शेअरमागे १ बोनस शेअर दिला आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करावी.)