करण जोहरची धर्मा प्रोडक्शन्स कंपनी मुकेश अंबानी यांच्या रडारवर, मोठा डाव लावण्याची शक्यता
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  करण जोहरची धर्मा प्रोडक्शन्स कंपनी मुकेश अंबानी यांच्या रडारवर, मोठा डाव लावण्याची शक्यता

करण जोहरची धर्मा प्रोडक्शन्स कंपनी मुकेश अंबानी यांच्या रडारवर, मोठा डाव लावण्याची शक्यता

Oct 14, 2024 12:59 PM IST

Dharma Productions news : मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लवकरच निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याच्या धर्मा प्रॉडक्शन्समध्ये हिस्सा खरेदी करण्याची शक्यता आहे.

करण जोहरची धर्मा प्रोडक्शन्स कंपनी मुकेश अंबानी यांच्या रडारवर, मोठा डाव लावण्याची शक्यता
करण जोहरची धर्मा प्रोडक्शन्स कंपनी मुकेश अंबानी यांच्या रडारवर, मोठा डाव लावण्याची शक्यता

mukesh ambani and karan johar : ‘करलो दुनिया मुठ्ठी में…’ म्हणत रिलायन्सच्या साम्राज्याचा विस्तार करत सुटलेल्या मुकेश अंबानी यांची नजर आता बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांच्या धर्मा प्रोडक्शन्सवर आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज करण जोहरच्या कंपनीत हिस्सा खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये वाटाघाटीही सुरू आहेत.

इकॉनॉमिक टाइम्सनं या संदर्भातील वृत्त दिलं आहे. त्यानुसार, धर्मा प्रॉडक्शनमध्ये करण जोहरचा ९०.७० टक्के हिस्सा आहे. तर, त्याच्या आईचा ९.२४ टक्के हिस्सा आहे. वाढता उत्पादन खर्च, चित्रपटगृहांची घटती संख्या आणि झपाट्यानं वाढणारे ओओटी प्लॅटफॉर्म यामुळं बॉलिवूड स्टुडिओसमोर आव्हान उभं राहिलं आहे. त्यामुळं नव्या गुंतवणुकीची गरज वाढत आहे.

करण जोहर गेल्या काही काळापासून गुंतवणूकदाराच्या शोधात आहे. परंतु आर्थिक बोलणी फिसकटल्यामुळं काही व्यवहार पूर्ण झालेले नाहीत. रिलायन्सनं माध्यम क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याआधी रिलायन्स इंडस्ट्रीजनं बालाजी प्रोडक्शनमध्ये एक छोटासा हिस्सा विकत घेतला आहे. हाच फॉर्म्युला इथंही अवलंबला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रिलायन्सच्या कंटेन्ट पोर्टफोलिओमध्ये जिओ स्टुडिओज, वायकॉम १८ स्टुडिओज, कोलोसिअम मीडिया आणि बालाजी फिल्म्स (छोटा हिस्सा) आहेत. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये जिओ स्टुडिओनं बॉक्स ऑफिसवरून ७०० कोटी रुपयांची कमाई केली. स्त्री २ हा या प्रोडक्शन हाऊसचा चित्रपट होता.

अनेक प्रोडक्शन हाऊस गुंतवणुकीच्या प्रतीक्षेत

कोविड महामारीचा सर्वाधिक फटका ज्या क्षेत्रांना बसला आहे, त्यात सिनेमा उद्योग प्रमुख आहे. कोविड काळात सर्वकाही ठप्प असल्यामुळं प्रोडक्शन हाऊसेसना आर्थिक चणचणीचा सामना करावा लागला. आता या सगळ्या प्रोडक्शन कंपन्या पुन्हा आर्थिकदृष्ट्या उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी निधी उभारणीची धडपड सुरू आहे.

'सारेगामा'शी देखील सुरू होती धर्मा प्रोडक्शनची चर्चा

रिलायन्सच्या आधी धर्मा प्रॉडक्शन ही कंपनी संजीव गोएंका यांच्या नेतृत्वाखालील सारेगामासोबत हिस्सा विक्रीसाठी बोलणी करत असल्याची चर्चा होती. ‘सारेगामा’नं ८ ऑक्टोबर रोजी एक्स्चेंजला या संदर्भात माहिती दिली होती. याबाबतीत पुढं काहीही झालेलं नाही असं सारेगामानं स्पष्ट केलं होतं.

Whats_app_banner