मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Mukesh Ambani : मुकेश अंबानीं जिओ सिनेमातून कमावणार कोट्यवधी रुपये, असा आहे त्यांचा मेगा प्लान

Mukesh Ambani : मुकेश अंबानीं जिओ सिनेमातून कमावणार कोट्यवधी रुपये, असा आहे त्यांचा मेगा प्लान

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
May 15, 2023 03:55 PM IST

Mukesh Ambani : सध्या जिओ सिनेमावरील आयपीएल सामन्यांच्या विक्रमी संख्येने प्रेरित होऊन मुकेश अंबानी यांनी आता प्रीमियम सबस्क्रिप्शन योजना सादर केली आहे.

Mukesh Ambani Jio cinema HT
Mukesh Ambani Jio cinema HT

Mukesh Ambani : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आता जिओ सिनेमातून पैसे कमवण्यासाठी सज्ज आहेत. इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट सामना आजकाल मुकेश अंबानींच्या जिओ सिनेमावर विनामूल्य दाखवला जात आहे, परंतु आता मुकेश अंबानींच्या जिओ सिनेमाने एचबीओ आणि इतर कंन्टेटसाठी प्रीमियम सबस्क्रिप्शन रक्कम आकारण्याचा निर्णय़ घेतला आहे. भारतातील अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमाने प्रीमियम सबस्क्रिप्शन सेवा सुरू केली आहे.

आतापर्यंत जिओ सिनेमावरील सर्व कंन्टेट विनामूल्य होता. मात्र आता जिओ सिनेमा आपल्या ग्राहकांकडून पैसे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे. Jio Cinema ने १ वर्षासाठी प्रीमियम सबस्क्रिप्शनसाठी ९९९ रुपये आकारण्याचा निर्णय घेतला आहे. एचबीओ आणि वॉर्नर ब्रदर्सच्या कंन्टेटसाठी यूजर्सकडून शुल्क आकारण्याचा Jio सिनेमाचा प्रयत्न आहे.

एलारा कॅपिटलचे वरिष्ठ उपाध्यक्ष करण तौरानी म्हणाले, "आम्हाला वाटते की मुकेश अंबानी ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी प्रीमियम सबस्क्रिप्शन सादर करून स्पर्धा करण्याचा प्रयत्न करत आहेत. हाॅटस्टार, अॅमेझाॅन, नेटफ्लिक्ससारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मची वार्षिक सदस्यता १००० रुपये ते २००० रुपयांपर्यंत आहे. मुकेश अंबानीच्या जिओ सिनेमाला फारसे सशुल्क सदस्यता कमी मिळण्याची शक्यता आहे. कारण भारतातील यूजर्स जे कंन्टेट पाहतात त्यासाठीच पैसे देतात. एचबीओ आणि वॉर्नर ब्रदर्स सारखे कन्टेट भारतात फारसे लोकप्रिय नाही."

आता एप्रिलच्या शेवटी, वायकाॅम १८ ने बहु-वर्षीय बहु-दशलक्ष-डॉलर सामग्री करारावर स्वाक्षरी केली होती. वॉर्नर ब्रदर्स, डिस्कव्हरी इत्यादींसोबतच्या या करारांतर्गत, जिओ सिनेमा भारतात HBO, Max Original आणि Warner Bros. कंटेंट दाखवू शकतो. IPL सामने दाखवल्यानंतर Jio Cinema ला मोठ्या संख्येने ग्राहकांनी प्रतिसाद दिला आहे. आता त्याचा जिओ सिनेमाला होण्याची शक्यता आहे.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या