मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Neeta Ambani: काय सांगता! नीता अंबानी पितात जगातील सर्वात महागडे पाणी? किंमत वाचून व्हाल अवाक्!

Neeta Ambani: काय सांगता! नीता अंबानी पितात जगातील सर्वात महागडे पाणी? किंमत वाचून व्हाल अवाक्!

Jun 01, 2024 11:03 AM IST

Neeta Ambani Drinking Water: नुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, नीता अंबानी या जगातील सर्वात महागडे पाणी पितात. इतकंच नव्हे तर, हे पाणी एका प्रसिद्ध डिझायनरने डिझाईन केलेल्या खास बॉटलमधून त्यांच्यापर्यंत पोहोचते.

नीता अंबानी पितात जगातील सर्वात महागडे पाणी?
नीता अंबानी पितात जगातील सर्वात महागडे पाणी? (ANI)

रिलायन्स फाउंडेशनच्या नीता अंबानी यांना कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. भारतातच नव्हे तर जगभरात नीता अंबानींच्या नावाचा डंका आहे. नीता अंबानी त्यांच्या आलिशान लाईफस्टाईलसाठी आणि चिरतरुण सौंदर्यासाठी ओळखल्या जातात. उदयोजक, रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी सतत चर्चेत असतात. उद्योग, कला, क्रीडा, सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रात त्या सक्रिय असतात. या सर्वांपलीकडे जाऊन त्या आपल्या महागड्या वस्तूंसाठी देखील ओळखल्या जातात. आता आपण त्यांच्याबद्दल अशी एक गोष्ट जाणून घेणार आहोत, जी वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. नुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, नीता अंबानी या जगातील सर्वात महागडे पाणी पितात. इतकंच नव्हे तर, हे पाणी एका प्रसिद्ध डिझायनरने डिझाईन केलेल्या खास बॉटलमधून त्यांच्यापर्यंत पोहोचते.

ट्रेंडिंग न्यूज

काही दिवसांपूर्वी आयपीएल सामन्यादरम्यान सोशल मीडियावर नीता अंबानी यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्यांनी आपल्या हातात एक हटके डिझाईन असलेली बॉटल पकडली होती. हा फोटो समोर येताच नीता अंबानी जगातील सर्वात महागडे पाणी पीत असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. समोर आलेल्या माहितीनुसार, नीता अंबानी यांच्याजवळ असलेली ती अनोखी बॉटल आंतरराष्ट्रीय डिझायनर फर्नांडो अल्टमीरानो यांनी डिझाईन केली आहे. वातावानुकूलित असणारी ही बॉटल नीता अंबानी यांची आवडती बॉटल असल्याचे म्हटले जात आहे.

Multibagger stock : याला म्हणतात शेअर मार्केटची ताकद! अवघ्या एका महिन्यात पैसे झाले दुप्पट

नीता अंबानी पितात ‘गोल्ड वॉटर’!

विशेष म्हणजे त्या बॉटलपेक्षा त्यात असणाऱ्या पाण्याचीच चर्चा जास्त होत आहे. अनेकांना वाटतं असेल की, या पाण्यात असं काय खास आहे? नीता अंबानी पीत असलेले हे पाणी तब्बल ४९ लाख रुपये किंमतीचे आहे. 'एक्वा डि क्रिस्टालो ट्रिब्यूटो ए मोदिग्लिआनी' असे या पाण्याचे नाव आहे. या पाण्याला ‘गोल्ड वॉटर’देखील म्हटले जाते. महत्वाचं म्हणजे वर्षानुवर्षे तरुण दिसण्यासाठी हे पाणी नीता अंबानी पीत असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, नीता अंबानी यांनी याबाबत कधीच काहीही खुलासा केलेला नाही. त्यामुळे हे कितपत सत्य आहे याचा अंदाज लावता येणे कठीण आहे.

RBI : ब्रिटनच्या ताब्यात असलेलं १०० टन सोनं आरबीआयनं भारतात आणलं! देशासाठी हा निर्णय किती महत्त्वाचा?

काय आहे या पाण्याचे वैशिष्ट्य?

रिपोर्ट्सनुसार, हे पाणी ६० हजार अमेरिकन डॉलर म्हणजे आपल्या भारतीय चालनानुसार ४९ लाखाला विकले जाते. विशेष म्हणजे या पाण्यात २४ कॅरेट सोन्याचे कण, २३ कॅरेट सोन्याची राख, फ्रांसमधील एका झऱ्यातील नैसर्गिक पाणी आणि आणि आयलंडच्या ग्लेशिअरमधील पाणी यांचा समावेश असतो. या सर्व घटकांनी त्या पाण्याला अधिक महत्त्व प्राप्त होते. पाण्यात हे घटक मिसळल्याने तुमची त्वचा वर्षानुवर्षे तजेलदार, टवटवीत आणि चीरतरुण राहते.

व्हायरल फोटोचे सत्य का?

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर नीता अंबानी यांचा स्टेडियममधील एक फोटो व्हायरल झाला होता. यामध्ये त्यांच्या हातात ही डिझाईनर बॉटल दिसून आली होती. मात्र व्हॉयरल फोटोमागचं सत्य वेगळंच आहे. हा फोटो मॉर्फ असलयाचे समोर आले आहे. वास्तविक २०१५ मधील आयपीएलदरम्यानचा नीता अंबानी यांचा हा फोटो घेऊन साध्या बॉटलच्या जागी ही कस्टमाइज्ड बॉटल मॉर्फ आली होती.

WhatsApp channel