Mukesh Ambani : मुकेश अंबानींची एका दिवसाची कमाई ३४ कोटी रुपये, ही आहे त्यांची लक्झुरी लाईफस्टाईल
Mukesh Ambani networth: मुकेश धीरूभाई अंबानी हे भारतीय अब्जाधीश उद्योगपती आहेत. ते रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ते अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. मुकेश अंबानींची एकूण संपत्ती ८६०० कोटी अमेरिकन डाॅलर्स आहे. त्यांचा एक दिवसाची कमाई ३४ कोटींच्या घरात जाते.
Mukesh Ambani networth : : मुकेश धीरूभाई अंबानी हे भारतीय अब्जाधीश उद्योगपती आहेत. ते रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, फॉर्च्यून ग्लोबल 500 कंपनी आणि बाजार मूल्यानुसार भारतातील सर्वात मौल्यवान कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. मुकेश अंबानींची एकूण संपत्ती ८६०० कोटी अमेरिकन डाॅलर्स आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मुकेश अंबानी हे देशातील मोठ्या आणि प्रतिष्ठित उद्योगपतींपैकी एक आहेत. देशातील श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत मुकेश अंबानी यांचा समावेश आहे. मुकेश अंबानींकडे अपार संपत्ती आहे. बातमीनुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ८६०० कोटी डॉलर्स आहे. मुकेश अंबानी यांना तीन मुले आहेत. आकाश, अंबानी, ईशा अंबानी आणि अनंत अंबानी. आकाश अंबानीने श्लोका मेहतासोबत लग्न केले आहे. ईशा अंबानीने आनंद पिरामलसोबत लग्न केले आहे. काही काळापूर्वी अनंत अंबानी यांची राधिका मर्चंटसोबत एंगेजमेंट झाली आहे.
एवढ्या मोठ्या दिग्गज उद्योगपतीच्या लाईफस्टाईल्स, बंगला, संपत्ती यांबद्दल सर्वसामान्य लोकांना उत्सुकता असते. रिअलटाईम फोर्ब्सच्या बिलिनिअर्सच्या यादीत त्यांचा क्रमांक ९ व्या स्थानी आहे.
मुकेश अंबानींची संपत्ती
मुकेश अंबानींची वार्षिक संपत्ती अंदाजे ८६०० कोटी अमेरिकन डाॅलर्स आहे. त्यांचा एका दिवसाचा पगार अंदाजे ३४ कोटी तर एका तासाची कमाई १.४ कोटी तर मिनिटात त्यांची कमाई अंदाजे २.३५ लाख रुपये आहे. रिलायन्स इंडस्ट्रीच्या एकूण हिश्शापैकी ४५ टक्के हिस्सा हा मुकेश अंबानींना जातो.
मुकेश अंबानी यांना जगातील सर्वात मोठी स्टार्ट-अप पेट्रोलियम रिफायनरी उभारण्याचे आणि अनेक अत्याधुनिक उत्पादन सुविधा निर्माण करण्याचे श्रेय दिले जाते, ज्यामुळे रिलायन्सच्या उत्पादन क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे.
म्हणूनच मुकेशने प्रसिद्ध भारतीय मीडिया ट्रान्समिशन ग्रुप 'एअरटेल' सोबत हातमिळवणी केली आणि जिओ ब्रॉडबँड सुरु केले. जिओने अवघ्या १७० दिवसांत १.५ अब्ज ग्राहक जोडले. त्याची सध्या ३,७०० स्टोअर्स आणि १५ दशलक्ष ग्राहक वारंवार खरेदी करणारे आहेत.जिओच्या माध्यमातून त्यांनी देशविदेशातील लाखो कंपन्यांचे अधिग्रहण केले आहे. आजपर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीसह प्रत्येक क्षेत्रात रिलायन्सने आपले विस्तारीकरण देशविदेशात केले आहे.
एवढ्या प्रचंड संपत्तीने मुकेश अंबानींचे जीवन लक्झरी आहे. त्याच्याकडे अनेक आलिशान बंगले, गाड्या आहेत, अगदी खाजगी जेट देखील आहे.
अँटिलिया
मुकेश अंबानींची मुंबईतील अँटिलिया इमारत ही सर्वात महागडी मालमत्ता आहे. ही मालमत्ता अल्टामाउंट रोड, कुंबला हिल, मुंबई येथे आहे. अँटिलिया बिल्डिंग ही जगातील दुसरी सर्वात महाग मालमत्ता म्हणून ओळखली जाते. यात एक मेगा-मंदिर, एक सलून, एक खाजगी आइस्क्रीम पार्लर आणि एक चित्रपटगृह देखील आहे. अँटिलियाची किंमत अंदाजे १५ हजार कोटी रुपये आहे.
महागडे खाजगी जेट
फाल्कोन ९०० ईएक्स हे जगभरातील अब्जाधीशांचे सर्वात आवडते जेट देखील मुकेश अंबानी यांच्याकडे आहे. या विमानात लक्झुरी मनोरंजन प्रणाली, संगीत प्रणाली आणि वायरलेस कम्युनिकेशनने सुसज्ज आहे. हे जेट जास्तीत जास्त ४४० किमी प्रतितास वेगाने उडते. तर एअरबस ए ३१९ हे पंचतारांकित पोर्टेबल विमानांचाही मालकी हक्क मुकेश अंबानींकडे आहे. या विमानाची खास गोष्ट म्हणजे यात सर्व काही लक्झुरी गोष्टी आहेत.
लक्झुरी कार कलेक्शन
मुकेश अंबानी यांच्याकडे अनेक आलिशान गाड्या आहेत, त्यापैकी त्यांच्या ३ कार या सर्वात महागड्या आणि लक्झरी कार आहेत, जगभरातील अब्जाधीशांना या गाड्या आवडतात. त्यात प्रामुख्याने मर्सिडिज मेबॅच ६२, बीएमडब्ल्यू ७६० एलआय, अँस्टन मार्टिन रॅपिड या गाड्यांचा समावेश आहे.
मुकेश अंबानींच्या ड्रायव्हरचा पगार
मुकेश अंबानींच्या या लक्झुरी गाड्या चालवणाऱ्या ड्रायव्हरचा पगार अंदाजे २ लाख रुपये प्रती महिना आहे. याचाच अर्थ वर्षात त्याचा पगार अंदाजे २४ लाखांच्या घरात जातो.
संबंधित बातम्या