Reliance Retail ESOPs : मुकेश अंबानी यांच्या एका निर्णयामुळं रिलायन्स रिटेलचे १५ कर्मचारी झाले कोट्यधीश-mukesh ambani owned reliance retail grants esops worth rs 351 crore to top employees ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Reliance Retail ESOPs : मुकेश अंबानी यांच्या एका निर्णयामुळं रिलायन्स रिटेलचे १५ कर्मचारी झाले कोट्यधीश

Reliance Retail ESOPs : मुकेश अंबानी यांच्या एका निर्णयामुळं रिलायन्स रिटेलचे १५ कर्मचारी झाले कोट्यधीश

Aug 29, 2024 01:55 PM IST

Reliance Retail ESOPs : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेलनं आपल्या १५ वरिष्ठ कर्मचाऱ्यांना मोठी ऑफर दिली आहे. ही ऑफर शेअर खरेदीची आहे.

Reliance Retail : रिलायन्स रिटेलच्या कर्मचाऱ्यांना अंबानींनी दिली मोठी ऑफर; कोट्यधीश होण्याची संधी
Reliance Retail : रिलायन्स रिटेलच्या कर्मचाऱ्यांना अंबानींनी दिली मोठी ऑफर; कोट्यधीश होण्याची संधी

Reliance Retail news : बाजार भांडवलाच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या रिलायन्स रिटेलनं आपल्या १५ वरिष्ठ अधिकाऱ्यांना खास भेट दिली आहे. कंपनीनं या अधिकाऱ्यांना ३५१ कोटी रुपयांचे शेअर वितरीत केले आहेत.

इम्प्लॉई स्टॉक ऑप्शन प्लॅन (ESOPs) च्या अंतर्गत हे शेअर इश्यू करण्यात आले आहेत. अशी माहिती रिलायन्स रिटेलनं रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (RoC) ला दिल्याचं वृत्त इकॉनॉमिक टाइम्सनं दिलं आहे. कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ESOPs ही योजना राबवली जाते. त्या अंतर्गत कर्मचाऱ्यांना विशिष्ट किंमतीला कंपनीचे शेअर्स खरेदी मुभा दिली जाते. ही किंमत सर्वसाधारण किंमतीपेक्षा कमी असते.

एक शेअर किती रुपयांना?

रिलायन्स रिटेल लवकरच आयपीओ आणणार आहे. त्याआधीच कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना ही ऑफर दिली आहे. या माध्यमातून ४.४१७ दशलक्ष शेअर्स वितरीत केले आहेत. या शेअरचं दर्शनी मूल्य (face value) १० रुपये असून ७९६.५० रुपये प्रति शेअर या किंमतीनं ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

रिलायन्स रिटेलच्या आयपीओची उत्सुकता

शेअर बाजारात सातत्यानं नवनवे आयपीओ दाखल होत आहेत. गुंतवणूकदारही मोठ्या उत्साहानं त्यात भाग घेत आहेत. रिलायन्स रिटेलच्या आयपीओवर अनेकांचं लक्ष आहे. या आयपीओला तुफान प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. 

रिलायन्स रिटेल ही भारतातील सर्वात मोठी किरकोळ विक्री क्षेत्रातील कंपनी म्हणून ओळखली जाते. कंपनीच्या वेबसाइटनुसार, त्याचे सध्या ३०४ दशलक्ष नोंदणीकृत ग्राहक आहेत आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षात त्याच्या सर्व स्टोअरमध्ये १.०६ अब्जाहून अधिक लोकांची नोंद झाली आहे. किराणा, ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, जीवनशैली आणि औषधी उत्पादनांमध्ये ही कंपनी व्यवसाय करते.

रिलायन्सची सर्वसाधारण सभा आज

रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) आज होत आहे. या सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी हे रिटेल आणि टेलिकॉम कंपन्यांच्या आयपीओबद्दल घोषणा करतील अशी अपेक्षा आहे. तज्ज्ञांच्या मते, या व्हर्च्युअल एजीएममध्ये ऊर्जा प्रकल्प, हरित ऊर्जा आणि वाणिज्य क्षेत्राशी संबंधित योजना मांडल्या जातील.

अंबानी कुटुंबातील पुढची पिढी कंपनीमध्ये सक्रिय झाल्यानंतर ही पहिली सर्वसाधारण सभा आहे. मुकेश अंबानी यांची कन्या ईशा, मुलगा आकाश आणि अनंत यांची डिसेंबर २०२३ मध्ये रिलायन्स इंड्रस्टीजचे बिगर कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

विभाग