मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Campa Cola : कोका कोला आणि पेप्सिकोला टक्कर देण्याची मुकेश अंबांनीची तयारी, जाणून घ्या प्लान

Campa Cola : कोका कोला आणि पेप्सिकोला टक्कर देण्याची मुकेश अंबांनीची तयारी, जाणून घ्या प्लान

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Apr 11, 2023 12:56 PM IST

Campa Cola : मुकेश अंबानी आपल्या साॅफ्ट ड्रिंक बिझनेसला तेजीत आणण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी चेन्नईस्थित साॅफ्ट ड्रिक कंपनी काली एरेटेड वाॅटरशी चर्चा सुरु केली आहे.

mukesh ambani HT
mukesh ambani HT

Campa Cola : मुकेश अंबानी (mukesh Ambani ) आपल्या साॅफ्ट ड्रिंक बिझनेसला तेजीत आणण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी चेन्नईस्थित साॅफ्ट ड्रिक कंपनी काली एरेटेड वाॅटरशी (Kali Aerated water) चर्चा सुरु केली आहे. रिपोर्टनुसार, रिलायन्स आपल्या साॅफ्ट ड्रिंक कॅम्पा कोलाच्या (Campa Cola) उत्पादन आणि वितरणासाठी काली एयरेटेड वाॅटरसह भागीदारी करण्याची शक्यता आहे. चेन्नईस्थित ही कंपनी बोवोंटो साॅफ्ट ड्रिंकची विक्री करते. (Bonvonto soft drink)

दोन्ही कंपन्यांची भागीदारी

मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंन्झ्युमर प्राॅडक्ट लिमिटेड कंपनी काली एयरेटेड वाॅटरसहित काम करण्याची शक्यता आहे. या दोन्ही कंपन्यांचे बिझनेस माॅडेल सर्वसाधारणपणे एकच आहे. या दोन्ही कंपन्या पेप्सिको, कोका कोलासारख्या कंपन्यांच्या तुलनेत कमी किंमतीत साॅफ्ट ड्रिंक बनवतात. गेल्या वर्षी आॅगस्टमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीने काली एरेटेडमध्ये हिस्सा खरेदी करण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

या करारावर नजर ठेवणाऱ्या एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, काली एरेटेड वाॅटरने उत्पादनाच्या प्रसिद्धीसाठी फारसा खर्च केलेला नाही. असे असले तरीही, कंपनी आपल्या देशांतर्गत बाजारपेठेत पेप्सिको, कोला कोलाला टक्कर देत आहे. या कंपनीची स्थापना १९१६ मध्ये झाली आहे.

रिलायन्सची रणनिती

रिलायन्स कन्झ्युमर प्राॅडक्ट पेप्सी आणि कोकचीच रणनिती आजमावत आहे. कंपनीने ३ आयपीएल टीम लखनऊ सुपर जाएंट्स, सनराईज हैदराबाद आणि पंजाब किंग्जसह करार केला आहे. कंपनी याद्वारे आपले आ्ॅन ग्राऊंड व्हिजिबिलीटी वाढवण्याच्या तयारीत आहेत.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग