मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Mukesh Ambani Gift : मुकेश अंबानींनी रिलायन्सच्या कर्मचाऱ्याला गिफ्ट दिलं दीड हजार कोटींचं घर, पाहा खासियत

Mukesh Ambani Gift : मुकेश अंबानींनी रिलायन्सच्या कर्मचाऱ्याला गिफ्ट दिलं दीड हजार कोटींचं घर, पाहा खासियत

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Apr 26, 2023 11:09 AM IST

Mukesh Ambani Gift : मुकेश अंबानींनी दानशुरता दाखवली आहे. त्याची सध्या चांगलीच चर्चा होतेय. त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीचे कर्मचारी आणि निकटवर्तीय मनोज मोदी यांना १५०० कोटींचे आलीशान घर गिफ्ट दिले आहे.

manoj modi and Mukesh Ambani HT
manoj modi and Mukesh Ambani HT

Mukesh Ambani Gift : देशातील सर्वाधिक अब्जाधीश मुकेश अंबानींनी दानशुरता दाखवली लआहे. त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे कर्मचारी आणि त्यांचे निकटवर्तीय मनोज मोदी यांना आलीशान घर गिफ्ट केले आहे. हे घर इतके मोठे आहे की त्याचा अंदाज केवळ किंमतींवरुनच करता येईल. या घराची किंमत १५०० कोटी रुपये आहे. मनोज मोदी हे रिलायन्स इंडस्ट्रीतील जूने आणि विश्वासू कर्मचारी आहेत. त्यांना मुकेश अंबानींचा उजवा हात म्हणूनही ओळखले जाते.

मॅजिक्स ब्रीक्सने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, हे घर एका २२ मजली इमारतीत असून नवी मुंबईतील प्राईम लोकेशन नेपीन सी रोडवर आहे. काही महिन्यांपूर्वीच मुकेश अंबानी यांनी मनोज मोदी यांना ही इमारत गिफ्ट केली आहे. अनेक दशकांपासून रिलायन्सचा अविभाज्य भाग असलेले मनोज मोदी हे सध्या रिलायन्स जिओ आणि रिटेलचे संचालक आहेत. त्यांना गिफ्ट म्हणून मिळालेल्या इमारतीचे नाव वृंदावन असे ठेवण्यात आले आहे. ही इमारत ज्या रस्त्यावर आहे, तिथे जिंदाल समुहाचे व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदालही राहतात. त्यांच्या घराचे नाव माहेश्वसी हाऊस आहे.

असे आहे वृंदावन

या इमारतीतील प्रत्येक फ्लोअर ८ हजार चौ.फूट आहे. या इमारतीतील एकूण क्षेत्रफळ १.७ लाख वर्ग फूट आहे. या इमारतीच्या पहिल्या ७ मजल्यावर पार्किंगची सोय आहे. या इमारतीत वापरण्यात आलेले फर्निचर थेट इटलीहून आयात करण्यात आले आहे. या दरम्यान मनोज मोदी यांनी मुंबईतील आपल्या दोन अपार्टमेंट्ची विक्री केली आहे. याची किंमत ४१.५ कोटी रुपये आहे. हे दोन्ही अपार्टमेंट्स महालक्ष्मी येथे आहेत.यातील एक फ्लॅट २८ व्या तर दुसरा फ्लॅट २९ व्या क्रमांकावर आहेत. मनोज मोदींना मुकेश अंबानींकडून मिळालेल्या गिफ्टची सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग